गुजरात मध्ये 13 ऑगस्ट 2021 रोजी गुंतवणूकदार परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता दूरदृष्टीच्या प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.
ऐच्छिक वाहन ताफा आधुनिकीकरण कार्यक्रम किंवा वाहन मोडीत काढण्यास संबंधीच्या धोरणांतर्गत वाहने मोडीत काढण्यासाठी मूलभूत सोयी सुविधांची उभारणी करण्याच्या दृष्टीने गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. इंटिग्रेटेड स्क्रॅपिंग हब उभारण्यासाठी अलंग येथील जहाजमोडणी उद्योगाचा अनुभव आणि मदत हे या परिषदेतील आकर्षणाचा मुख्य भाग असतील.
गुजरातच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या परिषदेचे आयोजन केले आहे. गुजरातमध्ये गांधीनगर येथे ही परिषद आयोजित केली आहे आणि त्यामध्ये सर्व संभाव्य गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्रातील तज्ञ, आणि केंद्र आणि राज्य सरकारचे संबंधित विभाग भाग घेतील.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री आणि गुजरातचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
वाहने मोडीत काढण्यासंबंधीचे धोरण
अपायकारक आणि प्रदूषणकारी वाहनांना पर्यावरणस्नेही पद्धतीने आणि सुरक्षितपणे मोडीत काढणे हे वाहने मोडीत काढण्याच्या धोरणाचे मुख्य लक्ष्य आहे.
स्वयंचलित वाहनपरीक्षण स्थानके आणि नोंदणीकृत वाहने मोडीत काढण्याच्या सुविधांच्या माध्यमातून वाहने मोडीत काढण्यासंबंधीच्या पायाभूत सुविधांचे जाळे उभारणे हे या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे.