पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 फेब्रुवारी 2021 रोजी गुजरात उच्च न्यायालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात सकाळी 10.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपले विचार व्यक्त करणार आहेत. यावेळी ते गुजरात उच्च न्यायालयाला 60 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल एका टपाल तिकिटाचे देखील प्रकाशन करतील. केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे आणि गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि गुजरातचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. न्यायव्यवस्थेशी संबंधित समुदायातील सदस्य देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.