पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 नोव्हेंबर 2022 रोजी म्हणजेच उद्या विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे सकाळी 11 वाजता लचित बारफुकन यांच्या 400 व्या जयंती वर्षाच्या समारोप समारंभाला संबोधित करणार आहेत.
विस्मृतीत गेलेल्या नायकांचा योग्य पद्धतीने सन्मान करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत प्रयत्न असतो . याच अनुषंगाने, आपला देश 2022 या चालू वर्षात लाचित बारफुकन यांचे 400 वे जयंती वर्ष म्हणून साजरे करत आहे. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती माननीय श्री राम नाथ कोविंद यांच्या हस्ते गुवाहाटी येथे या उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले होते.
लचित बारफुकन यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1622 रोजी झाला आणि मृत्यू 25 एप्रिल 1672 ला झाला. बारफुकन हे अहोम राज्याच्या रॉयल आर्मीचे जनरल होते ज्यांनी मुघलांचा पराभव केला आणि औरंगजेबाच्या नेतृत्वाखाली मुघलांच्या विस्तारत जाणाऱ्या महत्त्वाकांक्षा यशस्वीपणे रोखल्या. 1671 मध्ये झालेल्या सराईघाटच्या लढाईत लचित बारफुकन यांनी आसामी सैनिकांना प्रेरीत करून मुघलांचा पराभव केला. लचित बारफुकन आणि त्याच्या सैन्याचा शौर्यपूर्ण लढा हा आपल्या देशाच्या इतिहासात प्रतिकारात्मक श्रेणीतल्या सर्वात प्रेरणादायी लष्करी पराक्रमांपैकी एक आहे.