पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (28 जानेवारी रोजी) सकाळी 11:30 वाजता राजस्थानमधील भिलवाडा येथे भगवान श्री देवनारायणजींच्या 1111 व्या 'अवतार महोत्सव' समारंभाला संबोधित करतील. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.
भगवान श्री देवनारायण जी यांची राजस्थानातील लोक पूजा करतात आणि देशभरात त्यांचे अनुयायी आहेत. विशेषत: लोकसेवेसाठी त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांचा आदर केला जातो.