पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 ऑक्टोबर, 2020 रोजी सकाळी 11.15 वाजता मैसूर विद्यापीठाच्या शताब्दी दीक्षांत समारंभामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाषण करणार आहेत. या कार्यक्रमाला कर्नाटकचे राज्यपाल तसेच विद्यापीठाचे इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठ कार्यकारी समिती आणि शैक्षणिक परिषदेचे सदस्य, खासदार, आमदार, संबंधित अधिकारी, जिल्हाधिकारी, विद्यापीठाचे माजी कुलगुरू, विद्यार्थी आणि पालक या दीक्षांत समारंभाला ऑनलाइन उपस्थिती लावणार आहेत.
विद्यापीठाविषयी माहिती-
मैसूर विद्यापीठाची 27 जुलै, 1916 रोजी स्थापना झाली. हे देशातले सहावे आणि कर्नाटकातले पहिले विद्यापीठ आहे. ‘नहि ज्ञानेन सदृशम्’ म्हणजेच ज्ञानाइतके महत्वाचे काहीच नाही, असे घोषवाक्य निश्चित करून त्या उद्देशाने ज्ञानदान करण्यासाठी या विद्यापीठाचे कार्य सुरू करण्यात आले. या विद्यापीठाच्या स्थापनेसाठी मैसूर संस्थानचे दूरदर्शी महाराज नलवाडी कृष्णराज वडियार आणि दिवाण सर एम.व्ही. विश्वेश्वरैय्या यांनी पुढाकार घेतला होता.