राम नवमीनिमित्त उद्या 10 एप्रिल 2022 रोजी दुपारी 1 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील जुनागड येथील गठिला परिसरात होणाऱ्या उमिया माता मंदिराच्या 14व्या स्थापना दिन सोहोळ्याला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री असताना त्यांच्याच हस्ते 2008 या वर्षी या मंदिराचे उद्घाटनदेखील झाले होते. त्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या सूचनेनुसार मंदिराच्या विश्वस्त मंडळाने कार्यकक्षेचा विस्तार करून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि आर्थिकदृष्ट्या गरीब रुग्णांना आयुर्वेदिक औषधांचे मोफत वाटप इत्यादींसारख्या विविध सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम सुरु केले.
उमिया माता ही कडवा पाटीदार समाजाची कुलदेवी समजली जाते.