भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जागतिक नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
"धन्यवाद पंतप्रधान @AlboMP. ऑस्ट्रेलिया दिनानिमित्त आपल्याला आणि ऑस्ट्रेलियाच्या मैत्रीपूर्ण लोकांना शुभेच्छा."
Thank you Prime Minister @AlboMP. Greetings to you and to the friendly people of Australia on Australia Day. https://t.co/48wUWuFxwV
— Narendra Modi (@narendramodi) January 26, 2023
नेपाळच्या पंतप्रधानांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
"@cmprachanda जी आपल्या स्नेहमय शुभेच्छांबद्दल धन्यवाद!"
Thank You @cmprachanda ji for your warm wishes! @PM_nepal_ https://t.co/6PlkrLsLru
— Narendra Modi (@narendramodi) January 26, 2023
भूतानच्या पंतप्रधानांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
"@PMBhutan डॉ. लोटे शेरिंग आपल्या स्नेहमय शुभेच्छांबद्दल धन्यवाद! दोन्ही देशांची प्रगती आणि समृद्धीसाठी भूतानबरोबरच्या आगळ्या वेगळ्या भागीदारीसाठी भारत वचनबद्ध आहे.”
Thank you @PMBhutan Dr. Lotay Tshering for your warm wishes! India is committed to its unique partnership with Bhutan for progress and prosperity of both our nations. https://t.co/eFbhhLGWNX
— Narendra Modi (@narendramodi) January 26, 2023
मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
"राष्ट्राध्यक्ष @ibusolih, आपल्या स्नेहमय शुभेच्छांबद्दल धन्यवाद. समान लोकशाही मूल्यांच्या आधारे भारत-मालदीव भागीदारीने साधलेली शाश्वत प्रगती पाहून आनंद वाटत आहे."
Thank you for your warm greetings, President @ibusolih. Glad to see the sustained progress achieved by India-Maldives partnership, underpinned by common democratic values. https://t.co/oiTJMaV1Z2
— Narendra Modi (@narendramodi) January 26, 2023
इस्रायलच्या पंतप्रधानांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
"भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण दिलेल्या हार्दिक शुभेच्छांबद्दल धन्यवाद, पंतप्रधान @netanyahu.आपली धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल अशी आशा आहे."
Thank you for your warm wishes for India's Republic Day, PM @netanyahu. Look forward to further strengthening our strategic partnership. https://t.co/SvHPMJxBVx
— Narendra Modi (@narendramodi) January 26, 2023
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
"भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रिय मित्र @EmmanuelMacron, आपण दिलेल्या स्नेहमय शुभेच्छांबद्दल कृतज्ञ आहे.
भारताच्या जी20 अध्यक्षपदाच्या यशासाठी आणि भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीच्या 25 व्या वर्षानिमित्त एकत्र काम करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा मी पुरस्कार करतो. भारत आणि फ्रान्स जागतिक कल्याणाची ताकद आहेत.”
Grateful for your warm greetings my dear friend @EmmanuelMacron on India’s Republic Day. I share your commitment to work together for success of India’s G20 Presidency & 25th anniversary of India-France Strategic Partnership. India and France together are a force for global good. https://t.co/BgCavJ97tF
— Narendra Modi (@narendramodi) January 26, 2023
मॉरिशसच्या पंतप्रधानांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
"धन्यवाद, पीएम @KumarJugnauth. आधुनिक प्रजासत्ताक म्हणून आपल्या सामायिक वाटचालीत, दोन्ही देश लोककेंद्रित विकासाचे जवळचे भागीदार आहेत. मॉरिशसबरोबरची आपली दीर्घकालीन भागीदारी नवी उंची गाठेल अशी आशा आहे.”
Thank you, PM @KumarJugnauth. In our shared journey as modern Republics, our two countries have been partnering closely in people-centred development.
— Narendra Modi (@narendramodi) January 26, 2023
Looking forward to taking our cherished partnership with Mauritius to even greater heights. https://t.co/WX19xEGMAN