आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आघाडीद्वारे हवामान आणि आपत्ती प्रतिरोधकतेला प्रोत्साहन देण्यासाठी,भारत करत असलेल्या नेतृत्वाचा स्वीकार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मादागास्करचे राष्ट्राध्यक्ष अँड्री निरिना राजोएलीना यांचे आभार मानले आहेत.
मादागास्करच्या राष्ट्राध्यक्षांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
"धन्यवाद राष्ट्राध्यक्ष @SE_Rajoelina. हवामान बदलामुळे द्वीपकल्पीय देशांना भेडसावणारी आव्हाने हे आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आघाडी उपक्रमांतर्गत प्रतिरोधक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांच्या प्रमुख केंद्रस्थानी आहे."
Thank you President @SE_Rajoelina. The challenges faced by Island States due to climate change are a key focus of our efforts under the CDRI initiative to create resilient infrastructure. https://t.co/iMmULZhf0o
— Narendra Modi (@narendramodi) May 5, 2022