यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.
राष्ट्राध्यक्ष सीसी, भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:
"यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांचा आभारी आहे.@AlsisiOfficial"
I am grateful to President Abdel Fattah el-Sisi for gracing this year’s Republic Day celebrations with his august presence.@AlsisiOfficial pic.twitter.com/S58TP4msSo
— Narendra Modi (@narendramodi) January 26, 2023