पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत संपन्न झालेल्या राज्यांच्या मुख्य सचिवांच्या दोन दिवसीय परिषदेला हजेरी लावली.
एका ट्विट थ्रेडमध्ये, पंतप्रधानांनी मुख्य सचिवांशी संवाद साधताना ज्या विषयावर त्यांनी भर दिला होता त्या विषयांवर विस्तृतपणे सांगितले.
त्यांनी ट्विट केले:
"गेल्या दोन दिवसांपासून आपण दिल्लीतील मुख्य सचिवांच्या परिषदेत झालेल्या व्यापक चर्चेचे साक्षीदार आहोत. आजच्या माझ्या वक्तव्यादरम्यान, लोकांचे जीवन आणखी सुधारू शकेल आणि भारताच्या विकासाचा मार्ग बळकट करू शकेल अशा विविध विषयांवर भर दिला."
"जगाच्या नजरा भारतावर असल्याने आपल्या तरुणांच्या समृद्ध प्रतिभा सह येणारी वर्षे आपल्या राष्ट्राची आहेत. अशा काळात, पायाभूत सुविधा, गुंतवणूक, नावीन्य आणि समावेश हे चार स्तंभ सर्व क्षेत्रांमध्ये सुशासनाला चालना देण्याच्या आमच्या प्रयत्नांना चालना देतील."
"आपण आपल्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला बळकट करत राहिले पाहिजे यावर माझा ठाम विश्वास आहे. आत्मनिर्भर होण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. स्थानिक उत्पादने लोकप्रिय करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात गुणवत्ता का आवश्यक आहे यावरही प्रकाश टाकला."
"मुख्य सचिवांना निर्बुद्ध अनुपालन आणि कालबाह्य कायदे तसेच जुने नियम संपविण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. ज्या काळात भारत अतुलनीय सुधारणा सुरू करत आहे, त्या काळात अतिनियमन आणि निर्बुद्ध निर्बंधांना वाव नाही."
"मी बोललेल्या इतर काही मुद्द्यांमध्ये PM
गतिशक्ती आणि ही दृष्टी पूर्ण करण्यासाठी समन्वय कसा निर्माण करायचा याचा समावेश आहे. मिशन LiFE मध्ये उत्साह वाढवावा आणि मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करावे असे आवाहन मुख्य सचिवांना केले."
Over the last two days, we have been witnessing extensive discussions at the Chief Secretaries conference in Delhi. During my remarks today, emphasised on a wide range of subjects which can further improve the lives of people and strengthen India's development trajectory. pic.twitter.com/u2AMz2QG6I
— Narendra Modi (@narendramodi) January 7, 2023