पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष, शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद झाला.
उभय नेत्यांनी पश्चिम आशियाई क्षेत्रातील घडामोडींवर विचारविनिमय केला.
दोन्ही नेत्यांनी दहशतवाद, ढासळती सुरक्षा परिस्थिती आणि नागरिकांच्या जीवितहानीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली.
दोन्ही नेत्यांनी सुरक्षा आणि मानवतावादी परिस्थितीबाबत त्वरित निराकरण करण्याचे आवाहन केले. त्यांनी प्रदेशातील शाश्वत शांतता, सुरक्षा आणि स्थैर्याच्या महत्त्वावर भर दिला.
भारत-यूएई सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या चौकटीत विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य बळकट करण्याच्या वचनबद्धतेचाही त्यांनी पुनरुच्चार केला.