पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांचे आज दूरध्वनीवरून संभाषण झाले.
उभय नेत्यांनी भारत-नेपाळ द्विपक्षीय सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेतला आणि पंतप्रधान प्रचंड यांच्या 31 मे ते 3 जून 2023 या नुकत्याच झालेल्या भारत भेटीदरम्यान झालेल्या चर्चेचा पाठपुरावा केला, जेणेकरून द्विपक्षीय भागीदारी पुढे नेणे आणि दोन्ही देशांमधील मैत्रीचे सखोल बंध अधिक दृढ करणे शक्य होईल.
जवळचा आणि मैत्रीपूर्ण शेजारी असलेला नेपाळ हा भारताच्या ‘नेबरहुड फर्स्ट’ धोरणाचा प्रमुख भागीदार आहे.
या दूरध्वनी संभाषणामुळे दोन्ही देशांमधील उच्चस्तरीय देवाणघेवाणीची परंपरा कायम राहिली आहे.