पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आज युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी, विविध क्षेत्रात, भारत-युक्रेन भागीदारी अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा केली.
तसेच,रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्षावर चर्चा करतांना, पंतप्रधानांनी भारताच्या लोक-केंद्री दृष्टिकोनाचा पुनरुच्चार केला आणि या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचा वापर करण्याचा सल्ला दिला.
दोन्ही देशांमधील सर्व मुद्यांवर लवकरात लवकर आणि शांततामय तोडगा काढण्यासाठीच्या सर्व प्रयत्नांना भारताचा संपूर्ण पाठिंबा राहील, असे त्यांनी अधोरेखित केले. या समस्येवर शांततामय तोडगा काढण्यासाठी, भारताला जे जे करणे शक्य आहे, ते सगळे आम्ही करत राहू, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.
युक्रेनच्या नागरिकांना भारताकडून सातत्याने मिळत असलेल्या मानवतावादी सहाय्याबद्दल राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी भारताची प्रशंसा केली.
दोन्ही नेत्यांमधे परस्पर संपर्कात राहण्याबद्दल सहमती झाली.
Had a good conversation with President @ZelenskyyUa on strengthening the India-Ukraine partnership. Conveyed India’s consistent support for all efforts for peace and bringing an early end to the ongoing conflict. India will continue to provide humanitarian assistance guided by…
— Narendra Modi (@narendramodi) March 20, 2024