पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियन महासंघाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
उभय नेत्यांनी दोन्ही देशांमधील अलीकडील उच्चस्तरीय विचारविनिमयाचा पाठपुरावा करताना द्विपक्षीय सहकार्याच्या अनेक मुद्यांसंदर्भातील प्रगतीचा आढावा घेतला.
त्यांनी द्विपक्षीय संबंधांमधील घडामोडींचे सकारात्मक मूल्यांकन केले आणि आणि भारत-रशिया विशेष आणि विशेषाधिकारित धोरणात्मक सहकार्य आणखी दृढ करण्याच्या अनुषंगाने, भविष्यातील उपक्रमांसाठी एक विकसित आराखडा विकसित करण्यास सहमती दर्शवली.
उभय नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवरही विचारविनिमय केला.
पंतप्रधानांनी 2024 मधील रशियाच्या ब्रिक्स अध्यक्षपदासाठी शुभेच्छा दिल्या आणि भारताच्या पूर्ण पाठिंब्याचे आश्वासन दिले.
दोन्ही नेत्यांनी संपर्कात राहण्यासाठी सहमती दर्शवली.