पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अध्यक्ष डॉ सैय्यद इब्राहिम रायसी यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण केले. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय आणि प्रादेशिक दृष्ट्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
भारत-इराण संबंधांना ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि इथल्या जनतेमधील दृढ संबंधांचा संदर्भ असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
दोन्ही नेत्यांनी संपर्क केंद्र म्हणून चाबहार बंदराच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्यासह, द्विपक्षीय सहकार्य आणखी मजबूत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.दोन्ही नेत्यांनी ब्रिक्सची (BRICS) व्याप्ती वाढवण्यासह, बहुपक्षीय व्यासपीठावरील परस्पर सहकार्याबाबतही चर्चा केली, आणि दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या आगामी ब्रिक्स परिषदेमधील पुढील भेटीची आशा व्यक्त केली.