Quoteदोघांनीही भारत-युके व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आपल्या वचनबद्धतेची पुन्हा पुष्टी केली.
Quoteदोन्ही बाजूंनी लवकरात लवकर परस्पर लाभदायक मुक्त व्यापार करार (एफटीए) पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार
Quoteपंतप्रधान नरेंद्र मोदींनी युकेचे पंतप्रधान स्टार्मर यांना भारताला भेट देण्याचे दिले निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान  कीर स्टार्मर  यांच्याशी संवाद साधला.

मोदींनी युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारल्याबद्दल आणि मजूर पक्षाच्या निवडणुकीतील उल्लेखनीय विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

दोन्ही पंतप्रधानांनी भारत आणि युनायटेड किंग्डम यांच्यातील ऐतिहासिक संबंध अधोरेखित करुन भारत-युके व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आपल्या वचनबद्धतेची पुन्हा पुष्टी केली. त्याचबरोबर परस्पर लाभदायक ठरेल असा भारत-युके मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण करण्यासाठी एकत्र काम करण्याचे मान्य केले.

युकेच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासात भारतीय समुदायाच्या सकारात्मक योगदानाचे कौतुक करत, दोन्ही बाजूंच्या एकमेकांशी जवळीक असणाऱ्या लोकांच्या आपापसातील संबंधांना प्रोत्साहन देणे सुरू ठेवण्याचे मान्य केले.

पंतप्रधान मोदी यांनी युकेचे पंतप्रधान स्टार्मर यांना भारताला लवकरात लवकर भेट देण्याचे निमंत्रण देखील दिले.

त्याचबरोबर दोन्ही पंतप्रधानांनी सतत संपर्कात राहण्याचे मान्य केले.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India produced record rice, wheat, maize in 2024-25, estimates Centre

Media Coverage

India produced record rice, wheat, maize in 2024-25, estimates Centre
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 10 मार्च 2025
March 10, 2025

Appreciation for PM Modi’s Efforts in Strengthening Global Ties