पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्याशी संवाद साधला.
मोदींनी युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारल्याबद्दल आणि मजूर पक्षाच्या निवडणुकीतील उल्लेखनीय विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
दोन्ही पंतप्रधानांनी भारत आणि युनायटेड किंग्डम यांच्यातील ऐतिहासिक संबंध अधोरेखित करुन भारत-युके व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आपल्या वचनबद्धतेची पुन्हा पुष्टी केली. त्याचबरोबर परस्पर लाभदायक ठरेल असा भारत-युके मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण करण्यासाठी एकत्र काम करण्याचे मान्य केले.
युकेच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासात भारतीय समुदायाच्या सकारात्मक योगदानाचे कौतुक करत, दोन्ही बाजूंच्या एकमेकांशी जवळीक असणाऱ्या लोकांच्या आपापसातील संबंधांना प्रोत्साहन देणे सुरू ठेवण्याचे मान्य केले.
पंतप्रधान मोदी यांनी युकेचे पंतप्रधान स्टार्मर यांना भारताला लवकरात लवकर भेट देण्याचे निमंत्रण देखील दिले.
त्याचबरोबर दोन्ही पंतप्रधानांनी सतत संपर्कात राहण्याचे मान्य केले.