Quoteउभय नेत्यांनी प्रगतीचा आढावा घेतला आणि द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारीच्या भविष्याबाबत केली चर्चा
Quoteत्यांनी पश्चिम आशियातील परिस्थिती, विशेषत: दहशतवाद, हिंसाचार आणि नागरिकांच्या जीवितहानीबद्दल व्यक्त केली चिंता
Quoteप्रदेशातील शांतता, सुरक्षा आणि स्थैर्यासाठी एकत्र काम करण्याबाबत सहमती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे युवराज आणि  पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलअजीज अल सौद यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

उभय नेत्यांनी सप्टेंबर 2023 मधील युवराजांच्या भारत दौऱ्याचा पाठपुरावा करताना  द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी भविष्यातील द्विपक्षीय भागीदारीच्या अजेंड्याबाबतही  चर्चा केली.

पश्चिम आशियातील सद्यस्थितीबाबत उभय नेत्यांनी आपली मते व्यक्त केली.  त्यांनी दहशतवाद, हिंसाचार आणि नागरिकांच्या जीवितहानीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली.

इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्द्यावर भारताच्या दीर्घकालीन आणि तत्त्वनिष्ठ भूमिकेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला आणि युद्धग्रस्त लोकांसाठी मानवतावादी मदत सुरू ठेवण्याचे आवाहन केले. दोन्ही नेत्यांनी प्रदेशात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्यासाठी एकत्र काम करण्याबाबत सहमती दर्शवली. सागरी सुरक्षा आणि जलवाहतुकीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यावरही त्यांनी भर दिला.

एक्स्पो 2030 आणि फिफा फुटबॉल विश्वचषक 2034 चे यजमान म्हणून निवड झाल्याबद्दल  सौदी अरेबियाचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले.

दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्याबाबत सहमती दर्शवली.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
For PM Modi, women’s empowerment has always been much more than a slogan

Media Coverage

For PM Modi, women’s empowerment has always been much more than a slogan
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 8 मार्च 2025
March 08, 2025

Citizens Appreciate PM Efforts to Empower Women Through Opportunities