अरुणाचल प्रदेशातील विकास कामांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ट्विटला उत्तरादाखल पंतप्रधानांनी ट्विट केले आहे की,
"या विकासकामांमुळे अरुणाचल प्रदेशातील दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांचे जीवनमान सुधारेल."
केंद्रीय गृहमंत्री,अमित शहा यांनी ट्विट करून माहिती दिली की,त्यांनी किबिथू येथे आयटीबीपीद्वारे सुरू केलेल्या अनेक योजनांसह 9 मिनी-मायक्रो जलविद्युत प्रकल्पांच्या कामांना प्रारंभ केला. या अरूणाचल भेटीमध्ये त्यांनी महिलांच्या नेतृत्वाखालील बचत गटांच्या प्रदर्शनालाही भेट दिली.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
These development works will improve quality of life for people living in remote parts of Arunachal Pradesh. https://t.co/qAAIFLPW6K
— Narendra Modi (@narendramodi) April 11, 2023