पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पादहस्तासन(हात ते पाय अशी शरीर स्थिती) या योगासनावर सविस्तर ध्वनीचित्रफीती सादर केल्या आहेत. मणक्याच्या आरोग्यासाठी चांगले असणारे आणि मासिक पाळीचा त्रास कमी करण्यात मदत करणारे हे आसन नियमित करावे असे आवाहन, त्यांनी या चित्रफितीद्वारे लोकांना केले आहे.
10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन जवळ येत असताना सादर केलेल्या या ध्वनीचित्रफिती इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये असून, दोन्हीं मध्ये आसन करण्याचे टप्पे सविस्तर विशद केले आहेत.
पंतप्रधान X या समाज माध्यमावरील टिप्पणीत म्हणतात :
"पादहस्तासनाचे अनेक फायदे आहेत... त्याचा नियमित सराव करा."
"पादहस्तासन नियमित केल्यामुळे अनेक फायदे होतात."
Padahastasana has several benefits…do practice it. pic.twitter.com/MdWEBWgObg
— Narendra Modi (@narendramodi) June 16, 2024
पादहस्तासन का नियमित अभ्यास कई तरह से फायदेमंद है… pic.twitter.com/gVhT4DW5q9
— Narendra Modi (@narendramodi) June 16, 2024