कुनोच्या अधिवासातील, अनिवार्य विलगीकरणानंतर वातावरणात आणखी रुळण्यासाठी 2 चित्त्यांना एका मोठ्या बंद परिसरात सोडल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली.
पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की;
"आनंदाची बातमी! कुनोच्या अधिवासातील, अनिवार्य विलगीकरणानंतर वातावरणात आणखी रुळण्यासाठी 2 चित्त्यांना एका मोठ्या बंद परिसरात सोडले आहे. इतरांना लवकरच सोडले जाईल. सर्व चित्ते निरोगी, सक्रिय आणि वातावरणाशी व्यवस्थित जुळवून घेत आहेत हे जाणून देखील मला आनंद झाला. "
Great news! Am told that after the mandatory quarantine, 2 cheetahs have been released to a bigger enclosure for further adaptation to the Kuno habitat. Others will be released soon. I’m also glad to know that all cheetahs are healthy, active and adjusting well. 🐆 pic.twitter.com/UeAGcs8YmJ
— Narendra Modi (@narendramodi) November 6, 2022