पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काशीच्या लाखा मेळ्यातील भारत मिलापचे फोटो शेअर केले आहेत. हा कार्यक्रम सनातन संस्कृतीचा अविभाज्य भाग सांगत, पंतप्रधान मोदी यांनी ही पाच शतके जुनी परंपरा असल्याची माहिती दिली. संसदेत काशीचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी या अभिनव परंपरेचा अभिमान व्यक्त केला.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:
"काशी इथे लक्खा मेळा अंतर्गत आयोजित भारत मिलाप हा भारताच्या सनातन संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. गेल्या पाच शतकांपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमामुळे भगवान श्रीराम भक्तांचे भावनिक नाते आहे. खासदार या नात्याने, काशीच्या या परंपरेचा मला विशेष अभिमान वाटतो.
आजच्या कार्यक्रमाची काही छायाचित्रे..."
काशी में लक्खा मेला के तहत होने वाला भरत मिलाप भारत की सनातन संस्कृति का अभिन्न हिस्सा रहा है। पिछली करीब पांच सदियों से चली आ रही इस प्रस्तुति ने एक बार फिर प्रभु श्री राम के भक्तों को भावविभोर कर दिया। काशी के सांसद होने के नाते मुझे इस परंपरा को लेकर विशेष गर्व की अनुभूति हो… pic.twitter.com/NRAIfIExBe
— Narendra Modi (@narendramodi) October 25, 2023