आयुष्मान भारत योजनेला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केला आहे. सर्व भारतीय नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच पुरवणाऱ्या या योजनेचे लाभ नागरिकांना देशभरात कुठेही मिळू शकतात, असे मतही पंतप्रधानांनी नोंदवले आहे.
आयुष्मान भारत योजना गरिबांसाठी वरदान ठरली आहे, अशा आशयाचे एका नागरिकाचे ट्वीट शेअर करत, पंतप्रधानांनी त्याला प्रतिसाद दिला आहे--
“हे तर खरेच आहे. त्याचबरोबर, महत्वाचे म्हणजे या योजनेचे लाभ नागरिक देशभरात कुठेही घेऊ शकतात.”
It absolutely is. Equally important is the fact that one can avail of the benefits of this scheme all over India. https://t.co/xeZYMcd0ju
— Narendra Modi (@narendramodi) October 6, 2022