नवरात्रीच्या सहाव्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवी माता कात्यायनीची प्रार्थना करत सर्व भक्तांसाठी तिचे आशीर्वाद मागितले आहेत. देवी कात्यायनी ने सर्व भक्तांना आत्मबळ आणि आत्मविश्वासाचे वरदान द्यावे, असे पंतप्रधानांनी आपल्या प्रार्थनेत म्हटले आहे. देवीची स्तुती करणारे स्तोत्रही त्यांनी आपल्या ट्वीटमधून शेअर केले आहे.
आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधानांनी खालील श्लोक शेअर केला आहे.;
"चन्द्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहना।
कात्यायनी च शुभदा देवी दानवघातिनी॥
माता दुर्गेचे कात्यायनी रूप अद्भुत आणि अलौकिक आहे. आज तिची आराधना करुन प्रत्येकाला आत्मबळ आणि आत्मविश्वासाचा आशीर्वाद मिळावा, हीच माझी प्रार्थना आहे.”
चन्द्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहना।
— Narendra Modi (@narendramodi) October 1, 2022
कात्यायनी च शुभदा देवी दानवघातिनी॥
मां दुर्गा का कात्यायनी स्वरूप अत्यंत अद्भुत और अलौकिक है। आज उनकी आराधना से हर किसी को नए आत्मबल और आत्मविश्वास का आशीर्वाद मिले, यही कामना है। pic.twitter.com/cVCYQutiRB