भारताची निर्यात वेगाने वाढत आहे आणि सारे जग म्हणत आहे की भारत आता थांबणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते आज 77 व्या स्वातंत्र्यदिना निमित्ताने लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करत होते. जागतिक मानांकन संस्था भारताचे कौतुक करत आहेत. कोरोनानंतरच्या नव्या जागतिक रचनेत भारतीयांची क्षमता स्वीकारली जात आहे असे ते म्हणाले. जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती, त्यावेळी मानवी गरजांवर लक्ष केंद्रित करूनच उपाय शोधले जाऊ शकतात हे आपण जगाला दाखवून दिले असेही ते म्हणाले. भारत आज विकसनशील देशांचा (ग्लोबल साउथ) आवाज बनला आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था आता जागतिक पुरवठा साखळीचा भाग बनली आहे. यामुळे त्या पुरवठा साखळीला स्थिरता लाभते असे पंतप्रधानांनी सांगितले.