पंतप्रधान नरेंद्र मोदी 2005 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी आपल्या शिक्षकांचा कसा सन्मान केला, याची त्यांचे शालेय शिक्षक, श्री सोमभाई पटेल यांनी आठवण सांगितली आहे. एका व्हिडिओमध्ये ही आठवण सांगताना श्री पटेल यांनी, श्री मोदींना आपल्या गुरुजनांबद्दल वाटणाऱ्या आदर आणि आपुलकीचा उल्लेख केला आहे.
श्री पटेल सांगतात, " नरेंद्रभाईंनी 2005 मध्ये, अहमदाबाद इथं त्यांच्या शाळेतील सर्व शिक्षकांसाठी गुरु वंदना नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांनी सुमारे २७ शिक्षकांना कार्यकमाला बोलावलं होतं. त्यांनी प्रत्येक शिक्षकापाशी जाऊन, त्यांना त्यांच्या नावाने हाक मारून त्यांच्याशी बोलले, त्यांच्यासमोर नतमस्तक झाले, त्यांना पुष्पहार घालून त्यांनी सर्व शिक्षकांचा सत्कार केला.
श्री सोमनाथ पटेल यांनी सांगितलेल्या आठवणीनुसार गुजरातचे तत्कालीन राज्यपाल पं. नवल किशोर शर्मा, त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते, ते त्यांच्या भाषणात म्हणाले होते की, हा एक असाधारण कार्यक्रम आहे, भारतात यापूर्वी कुठेही असा कार्यक्रम झाला नव्हता. “नरेंद्रभाईंनी आपल्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. असा कार्यक्रम झाल्याचं कुणी पाहिलेले किंवा ऐकलेलेही नाही, असंही राज्यपाल म्हणाले होते,” श्री सोमनाथ पटेल पुढे सांगतात.
It is humbling to note the respect and affection that Narendra Modi has for his Gurus.
— Modi Story (@themodistory) July 13, 2022
His school teacher Sombhai Patel fondly remembers how Modi honoured his teachers in 2005 after becoming the Gujarat CM!
A #ModiStory on #GuruPurnimahttps://t.co/EdWZ1iSKel @themodistory pic.twitter.com/HyedjugdIN