पंतप्रधानांनी भारवाड समुदायाच्या सेवेप्रति समर्पणाचे, निसर्गाप्रति प्रेमाचे आणि गोरक्षणाप्रति वचनबद्धतेचे केले कौतुक
गावांचा विकास हे विकसित भारताच्या निर्मितीच्या दिशेने पहिले पाऊल आहे: पंतप्रधान
पंतप्रधानांनी आधुनिकतेच्या माध्यमातून समुदायाला सक्षम बनवण्यासाठी शिक्षणाच्या महत्त्वावर दिला भर
पंतप्रधानांनी देशाचे सर्वात मोठे सामर्थ्य म्हणून "सबका प्रयास" चे महत्व केले अधोरेखित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे गुजरातच्या भारवाड समाजाशी संबंधित बावलियाली धामच्या कार्यक्रमात आपले विचार मांडले. उपस्थितांना संबोधित करताना मोदी यांनी महंत श्री राम बापू जी, समुदायाचे नेते आणि उपस्थित हजारो भाविकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

त्यांनी भारवाड समुदायाच्या परंपरा तसेच या परंपरा जपण्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे पूजनीय संत आणि महंतांना आदरपूर्वक वंदन करून भाषणाची सुरुवात केली. ऐतिहासिक महाकुंभशी संबंधित अतीव आनंद आणि अभिमान अधोरेखित करताना, मोदी यांनी या पवित्र कार्यक्रमादरम्यान महंत श्री राम बापूजी यांना महामंडलेश्वर ही पदवी प्रदान करण्यात येत असल्याचे नमूद करून ते एक महत्वपूर्ण  यश आणि सर्वांसाठी अतिशय आनंदाची भावना असल्याचे सांगितले. त्यांनी महंत श्री राम बापूजी आणि समुदायाच्या परिवाराचे या योगदानाबद्दल आणि यशाबद्दल अभिनंदन केले .

गेल्या आठ दिवसांमध्ये भावनगरची भूमीचे भगवान श्रीकृष्णाच्या वृंदावनात रूपांतर झाल्याचे पहायला मिळत आहे असे मोदी म्हणाले. त्यांनी समुदायाने आयोजित केलेल्या भागवत कथेचा उल्लेख केला आणि तेथील वातावरण भक्तीने भारलेले असल्याचे वर्णन केले.  "बावलियाली हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर भारवाड समुदाय आणि इतर अनेकांसाठी श्रद्धा, संस्कृती आणि एकतेचे प्रतीक आहे", असे त्यांनी नमूद केले.

 

नागा लखा ठाकूर यांच्या आशीर्वादाने, बावलीयालीचे  पवित्र स्थान नेहमीच भारवाड समुदायाला योग्य दिशा आणि असीम प्रेरणा देत आले आहे यावर पंतप्रधानांनी  भर दिला. त्यांनी श्री नागा लखा ठाकूर मंदिराच्या पुनर्संचयनाची  सुवर्णसंधी अधोरेखित करत हा एक महत्त्वपूर्ण प्रसंग असल्याचे सांगितले. गेला आठवडाभर सुरु असलेल्या उत्साही कार्यक्रमांचा उल्लेख करून  त्यांनी  समुदायाच्या उत्साह आणि उर्जेचे कौतुक केले. त्यांनी हजारो महिलांनी सादर केलेल्या रास चा उल्लेख केला आणि ते वृंदावनाचे मूर्त स्वरूप आणि श्रद्धा, संस्कृती आणि परंपरा यांचे सुसंवादी मिश्रण असल्याचे सांगून ते प्रचंड आनंद आणि समाधानाचा  स्रोत असल्याचे वर्णन केले. कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या कलाकारांच्या योगदानाची त्यांनी दखल घेतली ज्यांनी  कार्यक्रमांमध्ये ऊर्जा भरली  आणि समाजाला समयोचित  संदेश दिले. भागवत कथेच्या माध्यमातून  समुदायाला मौल्यवान संदेश मिळत राहतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. त्यांनी यात सहभागी झालेल्या सर्वांचे मनापासून कौतुक केले आणि  त्यांचे प्रयत्न प्रशंसनीय असल्याचे सांगितले .

या शुभ प्रसंगी सहभागी होण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल महंत श्री राम बापू आणि बावलियाली धाम कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार मानत पंतप्रधानांनी संसदीय कामकाजामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. आगामी काळात अभिवादन करण्यासाठी नक्की भेट देईन असे आश्वासन त्यांनी दिले.

मोदी यांनी भारवाड समुदाय आणि बावलियाली धाम यांच्याशी असलेले त्यांचे दीर्घकाळापासूनचे  संबंध अधोरेखित केले, समुदायाच्या सेवेप्रति समर्पणाचे, निसर्गाप्रति त्यांचे प्रेम आणि गोरक्षणाप्रति त्यांच्या वचनबद्धतेचे कौतुक केले आणि या मूल्यांचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे असल्याचे सांगितले. त्यांनी समुदायात खोलवर प्रतिध्वनीत होणाऱ्या सामायिक भावनेवर भाष्य केले.

नागा लखा ठाकूर यांचा प्रगल्भ वारसा अधोरेखित करताना, मोदी यांनी त्यांच्या योगदानाची प्रशंसा सेवा आणि प्रेरणेचा दीपस्तंभ अशी केली. त्यांनी ठाकूर यांच्या प्रयत्नांचा चिरस्थायी प्रभाव अधोरेखित केला, ज्याचे शतकानुशतके स्मरण केले जाते आणि साजरा केला जातो. गुजरातमधील आव्हानात्मक काळात, विशेषतः भीषण दुष्काळाच्या काळात, पूज्य इसू बापूंनी दिलेल्या उल्लेखनीय सेवेबाबत आपले वैयक्तिक अनुभव सामायिक केले. धंधुका आणि रामपूर सारख्या प्रदेशांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांची त्यांनी दखल घेतली, जिथे पाण्याची टंचाई कायमस्वरूपी समस्या होती. त्यांनी पूज्य इसू बापू यांनी पीडितांसाठी केलेल्या निःस्वार्थ सेवेचे कौतुक केले आणि ते दैवी कार्य असल्याचे सांगितले ज्याचा  संपूर्ण गुजरातमध्ये आदर केला जातो.  पंतप्रधानांनी विस्थापित समुदायांच्या कल्याणासाठी, त्यांच्या मुलांच्या  शिक्षणासाठी, पर्यावरण संवर्धनासाठी आणि गिर गायींच्या संवर्धनासाठी इसू बापू यांनी समर्पित भावनेने केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.  इसू बापूंच्या कार्याचा प्रत्येक पैलू सेवा आणि करुणेची गाढ परंपरा प्रतिबिंबित करतो असे ते म्हणाले.

 

भारवाड समुदाय करीत असलेले   कठोर परिश्रम  आणि त्याग याविषयी  दृढ  वचनबद्धतेचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रगतीमध्‍ये त्यांनी  लवचिकतेवर भर दिला असल्याचे नमूद केले.  पंतप्रधानांनी या समुदायाशी आपण मागच्या काळामध्‍ये साधलेल्या संवादांची आठवण केली .त्यावेळी  त्यांनी काठी ऐवजी  लेखणी- पेन हातामध्‍ये घ्यावे यासाठी प्रोत्साहित केले  होते. ही गोष्‍ट   शिक्षणाचे महत्त्व दर्शवते. भारवाड समुदायाच्या नवीन पिढीने असाच  दृष्टिकोन स्वीकारल्याबद्दल आणि मुले शिक्षणामध्‍ये  पुढे जात आहेत,  याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी  अभिमान व्यक्त केला. यावेळी पंतप्रधानांनी पुढील प्रगतीची गरज अधोरेखित करताना ते म्हणाले, आता समुदायाच्या मुलींच्याही  हातामध्‍ये संगणक आले पाहिजेत. त्यांनी "अतिथी देवो भव" परंपरेच्या त्यांच्या मूर्त स्वरूपाचे कौतुक केले आणि निसर्ग आणि संस्कृतीचे रक्षक म्हणून या समुदायाच्या भूमिकेवर भर दिला.भारवाड समुदायाच्या अद्वितीय मूल्यांची त्यांनी नोंद घेतली. ज्याठिकाणी  संयुक्त कुटुंबात वृद्धांची काळजी घेतली जाते, हे काम म्हणजे  देवाची सेवा करण्यासारखी भावना प्रतिबिंबित केली जाते, त्याचे कौतुक केले. आधुनिकतेचा स्वीकार करताना परंपरा जपण्याच्या समुदायाच्या प्रयत्नांची कदर करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विस्थापित कुटुंबांच्या मुलांसाठी वसतिगृह सुविधा उपलब्ध करून देणे आणि जागतिक स्तरावर समुदायाला नवीन संधींशी जोडणे,  यासारख्या उपक्रमांचे कौतुक केले. त्यांनी समुदायाच्या मुलींनी खेळात उत्कृष्ट कामगिरी करावी अशी इच्छा व्यक्त केली आणि गुजरातच्या खेल महाकुंभात त्यांनी पाहिलेल्या क्षमता अधोरेखित केली. पंतप्रधानांनी  समुदायाच्या पशुपालनाबद्दलच्या समर्पणावर, विशेषतः गीर गायीच्या जातीचे जतन करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर भर दिला.  यामुळे देशाला अभिमान वाटला आहे, असे सांगून  त्यांनी गीर गायींच्या जागतिक मान्यते बद्दल भाष्य केले. त्याचबरोबर समुदायाने  त्यांच्या मुलांचीही त्यांच्या पशुधनाइतकीच  काळजी घेण्याचे आवाहन केले.

भारवाड समुदायाशी असलेले त्यांचे सखोल संबंध अधोरेखित करत, त्यांना आपले कुटुंब आणि भागीदार म्हणून संबोधित केले आणि पंतप्रधान  मोदी यांनी बावलियाली धाम येथील मेळाव्यात भाषण केले. पुढील 25 वर्षांत विकसित भारताच्या त्यांच्या दृष्टिकोनाला हा समुदाय पाठिंबा देईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले, लाल किल्ल्यावरून "सबका प्रयास" हे देशाचे सर्वात मोठे बळ आहे या विधानाचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी  विकसित भारत निर्माण करण्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून गावे विकसित करण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी  जनावरांना होणारा लाळ्या खुरकत या  आजाराचा उल्लेख करून त्याच्या विरोधात  लढण्यासाठी सरकारने पशुधनासाठी मोफत लसीकरण कार्यक्रम सुरू केला असल्याचे सांगितले. समुदायाने आपल्या  पशुधनासाठी नियमित लसीकरण सुनिश्चित करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी  केले. त्यांनी या उपक्रमाचे वर्णन करुणेचे कृत्य आणि दैवी आशीर्वाद मिळविण्याचा एक मार्ग आहे, असे केले. पंतप्रधान  मोदी यांनी पशुपालकांसाठी किसान क्रेडिट कार्ड सुरू केल्याचाही उल्लेख केला, ज्यामुळे त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते. त्यांनी स्थानिक पशुधनाच्या जातींचे जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि त्यांच्या संवर्धन आणि वाढीसाठी राष्ट्रीय गोकुळ अभियान हा एक महत्त्वाचा उपक्रम असल्याचे  अधोरेखित केले . त्यांनी समुदायाला या कार्यक्रमांचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी वृक्षारोपणाचे महत्त्व पुन्हा सांगितले आणि समुदायाला त्यांच्या मातांच्या सन्मानार्थ झाडे लावण्यास प्रोत्साहित केले. अतिरेकी शोषण आणि रासायनिक वापरामुळे त्रस्त झालेल्या पृथ्वीमातेचे आरोग्य पुनर्संचयित करण्याचा हा एक मार्ग असल्याचे त्यांनी वर्णन केले. त्यांनी नैसर्गिक शेतीच्या मूल्यावर भर दिला आणि जमीन पुनरुज्जीवित करण्यासाठी समुदायाला ही पद्धत स्वीकारण्याचे आवाहन केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारवाड समुदायाच्या सेवेतील समर्पणाचे कौतुक केले.माती मजबूत करण्यासाठी गुरांच्या शेणाची क्षमता अधोरेखित केली. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले आणि समुदायाला या कार्यात योगदान देण्याचे आवाहन केले.

 

पंतप्रधानांनी भारवाड समुदायाला मनापासून शुभेच्छा दिल्या आणि नागा लखा ठाकूर यांचे आशीर्वाद सर्वांवर सतत राहोत, अशी प्रार्थना केली. त्यांनी बावलियाली धामशी संबंधित सर्व व्यक्तींच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी आशा व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले, समुदायाच्या मुलांना, विशेषतः मुलींना, शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट कामगिरी करण्याचे आणि एका मजबूत समाज घडविण्‍यासाठी  योगदान देण्याचे आवाहन केले. आधुनिकता आणि सामर्थ्याद्वारे समुदायाचे सशक्तीकरण हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे,असे त्यांनी नमूद केले. या शुभ प्रसंगाचा भाग आपण बनल्याबद्दल आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करून पंतप्रधान मोदी यांनी  शेवटी सांगितले की, त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती त्यांना आणखी आनंद देणारी ठरली असती.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
The Bill to replace MGNREGS simultaneously furthers the cause of asset creation and providing a strong safety net

Media Coverage

The Bill to replace MGNREGS simultaneously furthers the cause of asset creation and providing a strong safety net
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 22 डिसेंबर 2025
December 22, 2025

Aatmanirbhar Triumphs: PM Modi's Initiatives Driving India's Global Ascent