महामहिम,
या दु:खद प्रसंगी आपण सर्व आज भेटत आहोत. आज जपानमध्ये पोहोचल्यावर मला तीव्र दु:ख झाले. मी गेल्या वेळी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा आबे सान यांच्यासोबत दीर्घकाळ संभाषण केले होते. त्यावेळी इथून परत जाताना ‘ते आपल्यातून कायमचे निघून गेले’ अशी बातमी ऐकावी लागेल असे मला कधीही वाटले नव्हते.
आबे सान आणि त्यांच्यासोबत तुम्ही परराष्ट्र मंत्र्याच्या भूमिकेतून भारत-जपान संबंधांना नवीन उंचीवर नेले होते आणि अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा व्यापक विस्तारही केला आहे. आपल्या मैत्रीने, भारत- जपान मैत्रीने, जागतिक प्रभाव निर्माण केला आहे आणि या सगळ्यासाठी आज भारतातील लोक आज आबे सान यांची यांचे स्मरण करतात. जपानचे स्मरण करतात. भारताला त्यांची उणीव भासत आहे.
पण मला विश्वास आहे, की तुमच्या नेतृत्वाखाली भारत-जपान संबंध अधिक दृढ होतील आणि अधिक मोठ्या उंचीवर पोहोचतील. तसंच मला ठाम विश्वास आहे की आपण जगातील समस्यांवर उपाय शोधण्यात आपण एकत्रित रित्या महत्वाची भूमिका बजावू शकू.