उपस्थित मान्यवर,

महोदय,

नमस्कार!

140 कोटी भारतीयांतर्फे मी या तिसऱ्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ शिखर परिषदेत तुम्हा सर्वांचे स्वागत करतो.

गेल्या दोन परिषदांमध्ये मला तुमच्यापैकी अनेक सहकाऱ्यांसोबत एकत्र काम करण्याची संधी मिळाली.

यावर्षी भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा तुमच्यासोबत या मंचावर एकत्र येण्याची संधी मिळत आहे याचा मला अत्यंत आनंद वाटतो.

मित्रांनो,

भारताने जेव्हा 2022 मध्ये जी-20 समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले तेव्हा आम्ही असा निश्चय केला होता की आम्ही जी-20 ला एक नवे स्वरूप देऊ.

व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषद हा आता असा मंच झाला ज्यावर आपण विकासाशी संबंधित समस्या आणि प्राधान्यक्रमांवर चर्चा केली.

आणि भारताने ग्लोबल साऊथ म्हणजेच जगाच्या दक्षिणेकडील देशांच्या आशा, आकांक्षा आणि प्राधान्यक्रमांवर आधारित जी-20 कार्यक्रमपत्रिका तयार केली.

एका समावेशक आणि विकास-केंद्री दृष्टीकोनासह जी-20 ला आपण पुढे नेले आहे.

जेव्हा आफ्रिकन महासंघाने जी-20 समूहात स्थायी सदस्यत्व मिळवली तो ऐतिहासिक क्षण हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे.

मित्रांनो,

आज सगळीकडे अनिश्चिततेचे वातावरण आहे, अशा काळात आपण भेटत आहोत.

जग अजून कोविडच्या प्रभावातून पूर्णपणे बाहेर पडू शकलेले नाही.

दुसरीकडे सर्वत्र युद्धाच्या वातावरणाने आपल्या विकासाचा वाटचालीसमोर आव्हाने उभी केली आहेत.

आपण हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जातच आहोत आणि आता आपल्याला आरोग्य सुरक्षा, अन्न सुरक्षा आणि उर्जा सुरक्षा यांच्या संदर्भातील चिंता देखील भेडसावत आहेत.

दहशतवाद,अतिरेकीपणा आणि फुटीरतावादी वृत्ती यांनी आपल्या समाजासाठी गंभीर धोका निर्माण केला आहे.

तंत्रज्ञानातील दरी आणि तंत्रज्ञानाशी संबंधित नवनवी आर्थिक आणि सामाजिक आव्हाने देखील उदयाला येत आहेत.

गेल्या शतकात तयार केलेले जागतिक प्रशासन आणि वित्तीय संस्था या शतकातील आव्हानांचा सामना करण्यात असमर्थ ठरल्या आहेत.

मित्रांनो,

जगाच्या दक्षिणेकडील देशांनी एकजुटीने, एका स्वरात, एकमेकांसोबत उभे राहून, एकमेकांचे सामर्थ्य बनणे ही काळाची गरज आहे.

आपण एकमेकांच्या अनुभवांतून शिकावे.

आपापल्या क्षमता एकमेकांशी सामायिक कराव्या.

सगळ्यांनी एकत्र येऊन आपापल्या संकल्पांची पूर्तता करावी.

एकत्र येऊन दोन तृतीयांश मानवतेला सन्मान प्राप्त करून द्यावा.

आणि जगाच्या दक्षिणेकडील सर्व देशांशी आपले अनुभव, आपल्या क्षमता सामायिक करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे.

आपला परस्परांशी असलेला व्यापार, समावेशक विकास, शाश्वत विकास ध्येयांच्या संदर्भातील प्रगती आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला आम्ही प्रोत्साहन देऊ इच्छितो.

गेल्या काही वर्षांमध्ये पायाभूत सुविधा, डिजिटल आणि उर्जा संपर्क यांच्यामुळे आपल्यातील परस्पर सहयोगाला अधिक चालना मिळाली आहे.

एलआयएफई (लाईफ) अभियानाच्या अंतर्गत आम्ही केवळ भारतातच नव्हे तर भागीदार देशांमध्ये देखील घरांच्या छतावरील सौर आणि नवीकरणीय उर्जा निर्मितीला प्राधान्य देत आहोत.

आम्ही आर्थिक समावेशन आणि प्रत्येकापर्यंत सेवा वितरणाचे आपले अनुभव सामायिक केले आहेत.

जगाच्या दक्षिणेकडील विविध देशांना युपीआय अर्थात एकात्मिक भरणा मंचाशी जोडून घेण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे.

 

शिक्षण, क्षमता निर्मिती आणि कौशल्य या क्षेत्रांमधील आमच्या भागीदारीत लक्षणीय प्रगती झाली आहे.

गेल्या वर्षी ग्लोबल साऊथ यंग डिप्लोमॅट मंचाची देखील सुरुवात करण्यात आली.

आणि ‘दक्षिण’ म्हणजेच ग्लोबल साऊथ उत्कृष्टता केंद्र आपल्यामध्ये क्षमता निर्मिती, कौशल्य विकास आणि माहितीच्या सामायीकीकरणाबाबत कार्य करत आहे.

मित्रांनो,

समावेशक विकासात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा म्हणजेच डीपीआयचे योगदान एखाद्या क्रांतीइतकेच महत्त्वाचे आहे.

आमच्या जी-20 अध्यक्षतेच्या काळात स्थापन करण्यात आलेले जागतिक डीपीआय भांडार हा डीपीआयसंदर्भात पहिला बहुपक्षीय एकमत मंच होता.

जगाच्या दक्षिणेकडील देशांतील 12 भागीदारांसह “इंडिया स्टॅक” सामायिक करण्याबाबत सामंजस्य करार झाले आहेत.

जगाच्या दक्षिणेकडील देशांमध्ये डीपीआयमध्ये तेजी आणण्यासाठी आम्ही सामाजिक प्रभाव निधी स्थापन केला आहे.

यामध्ये भारत सुरुवातीला 25 दशलक्ष डॉलर्सचे योगदान देणार आहे.

मित्रांनो,

आरोग्य सुरक्षेसाठी आमची मोहीम आहे – वन वर्ल्ड-वन हेल्थ.

आणि आमची संकल्पना आहे – “आरोग्य मैत्री” म्हणजेच “फ्रेन्डशिप फॉर हेल्थ”

आम्ही आफ्रिका आणि प्रशांत क्षेत्रातील बेटांच्या देशांमध्ये रुग्णालये, डायलिसीस मशिने, जीवन-रक्षक औषधे आणि जन औषधी केंद्रांच्या मदतीने ही मैत्री निभावली आहे.

मानवजातीवरील संकटांच्या वेळेला, भारत एक सर्वप्रथम प्रतिसाद देणाऱ्या देशाच्या रुपात मित्र देशांची मदत करत आहे.

पापुआ न्यू गिनीमध्ये झालेला ज्वालामुखीचा स्फोट असो अथवा केनियातील महापुराची घटना असो.

आम्ही गाझा पट्टी आणि युक्रेन मधील संघर्षग्रस्त क्षेत्रांमध्ये देखील मानवतावादी मदत पाठवली आहे.

मित्रांनो,

व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषद हे असे एक व्यासपीठ आहे जेथे, ज्या लोकांचे मत अजूनपर्यंत कोणी ऐकून घेतलेले नाही अशा लोकांच्या गरजा आणि आकांक्षा यांना या व्यासपीठावर मांडण्यासाठी आम्ही साद घालत आहोत.

आपले सामर्थ्य आपल्या ऐक्यामध्ये आहे आणि या ऐक्याच्या बळावर आपण सर्वजण एका नव्या दिशेकडे वाटचाल करू.

पुढच्या महिन्यात संयुक्त राष्ट्रांमध्ये समिट ऑफ फ्युचर होऊ घातली आहे. या परिषदेत पॅक्ट फॉर द फ्युचर हा करार करण्यासंदर्भात विचार सुरु आहेत.

या करारामध्ये जगाच्या दक्षिणेकडील देशांचा आवाज प्रखरतेने मांडता येईल असा सकारात्मक दृष्टीकोन आपण सर्वजण मिळून स्वीकारू शकतो का?

ह्या विचारांसह मी माझे मनोगत संपवतो.

आता मी तुम्हा सर्वांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहे.

खूप खूप धन्यवाद.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
5 Days, 31 World Leaders & 31 Bilaterals: Decoding PM Modi's Diplomatic Blitzkrieg

Media Coverage

5 Days, 31 World Leaders & 31 Bilaterals: Decoding PM Modi's Diplomatic Blitzkrieg
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister urges the Indian Diaspora to participate in Bharat Ko Janiye Quiz
November 23, 2024

The Prime Minister Shri Narendra Modi today urged the Indian Diaspora and friends from other countries to participate in Bharat Ko Janiye (Know India) Quiz. He remarked that the quiz deepens the connect between India and its diaspora worldwide and was also a wonderful way to rediscover our rich heritage and vibrant culture.

He posted a message on X:

“Strengthening the bond with our diaspora!

Urge Indian community abroad and friends from other countries  to take part in the #BharatKoJaniye Quiz!

bkjquiz.com

This quiz deepens the connect between India and its diaspora worldwide. It’s also a wonderful way to rediscover our rich heritage and vibrant culture.

The winners will get an opportunity to experience the wonders of #IncredibleIndia.”