पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गुजरातमधील बेचारजी येथे 115 व्या जनम जयंती कार्यक्रमाला संबोधित केले तसेच प्रल्हादजी पटेल यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशनही केले. गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंदरभाई पटेल हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पंतप्रधानांनी बेचारजीच्या महान भूमीला नमन केले तसेच स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसेवक प्रल्हादजी पटेल यांच्या स्मृतीला वंदन केले. प्रल्हादजी पटेलांचा समाजसेवक म्हणून असलेला उदारपणा आणि त्यांचा त्याग यांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. महात्मा गांधीच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रल्हादजी पटेलांनी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला आणि साबरमती तसेच येरवड्यात तुरुंगवास भोगला,
प्रल्हादजी पटेल यांच्या ठायी असलेल्या 'राष्ट्र प्रथम' भावनेचे प्रतीक सांगणारा प्रसंग पंतप्रधानांनी कथन केला. प्रल्हादजी तुरुंगात बंदीवान असता त्याच्या वडिलांचे देहावसान झाले. पण त्यावेळच्या वसाहतवादी शासकांनी अंत्यविधीला परवानगी देण्यासाठी माफी मागण्याची ठेवलेली अट मान्य करायचे प्रल्हादजींनी नाकारले. अनेक भूमीगत स्वातंत्र्यसैनिकांना त्यांनी सहकार्य केले. स्वातंत्र्यानंतर संस्थाने विलिन करण्यासाठी सरदार पटेलांना प्रल्हादजींनी मदत केल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. अशा अनेक महान स्वातंत्र्यसैनिकांचा उल्लेख इतिहासाच्या पुस्तकांमध्ये नसतो याबद्दल पंतप्रधानांनी खंत व्यकत केली. प्रल्हादजी पटेलांच्या पत्नी काशी बा यांनाही पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली. अशा महान व्यक्तींच्या जीवनाची व कार्यशैलीची नोंद केली जाणे आवश्यक आहे. त्यापासून तरुण वर्गाला प्रेरणा मिळेल असे पंतप्रधानांनी म्हटले.
सर्व विद्यापीठांनी संशोधन करुन स्वातंत्र्यसैनिकांच्या अज्ञात पैलूंबद्दल माहिती करून द्यावी असे आवाहन पंतप्रधानांनी केले. नवीन भारताच्या उभारणीत प्रल्हादजी पटेल यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले पाहिजे असे पंतप्रधानांनी सांगितले.