पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शास्त्रीय संगीतातील आदरणीय व्यक्तिमत्व पंडित जसराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधानांनी पंडित जसराज यांच्या संगीतातील अमर उर्जेबद्दल सांगितले आणि त्यांचा गौरवशाली वारसा जिवंत ठेवल्याबद्दल दुर्गा जसराज आणि पंडित शारंग देव यांची प्रशंसा केली. पंडित जसराज सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या उद्घाटन समारंभात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान बोलत होते.
भारतीय संगीत परंपरेतील ऋषीमुनींनी दिलेल्या अगाध ज्ञानाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. मोदी म्हणाले की ब्रह्मांड संचालित करणारी शक्ती नाद रूप असून हा ऊर्जेचा प्रवाह जाणून घेण्याचे सामर्थ्यच भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेला असाधारण बनवते.
"संगीत हे असे एक माध्यम आहे जे आपल्याला आपल्या सांसारिक कर्तव्यांची जाणीव करून देते आणि ते आपल्याला सांसारिक सीमा ओलांडण्यास मदत करते" असे पंतप्रधान म्हणाले.
भारतातील कला आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा जतन करण्याच्या ध्येयाबद्दल पंतप्रधानांनी पंडित जसराज सांस्कृतिक प्रतिष्ठानची प्रशंसा केली. त्यांनी प्रतिष्ठानला तंत्रज्ञानाच्या या युगातील दोन प्रमुख बाबींवर लक्ष केंद्रित करायला सांगितले. ते म्हणाले की, जागतिकीकरणाच्या या युगात भारतीय संगीताने आपली ओळख निर्माण केली पाहिजे. ते म्हणाले की, योग दिनाच्या अनुभवाने सूचित केले आहे की जगासाठी हा भारतीय वारसा लाभदायक ठरला आहे आणि भारतीय संगीतामध्येही मानवी अंतर्मनाला स्पर्श करण्याची क्षमता आहे . “जगातील प्रत्येक व्यक्तीला भारतीय संगीताबद्दल जाणून घेण्याचा, शिकण्याचा आणि लाभ घेण्याचा अधिकार आहे. हे पवित्र कार्य पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.
दुसरे म्हणजे, आजच्या युगात जेंव्हा तंत्रज्ञानाचा प्रभाव सर्वव्यापी असताना संगीत क्षेत्रातही तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान क्रांती व्हायला हवी, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी भारतीय वाद्ये आणि परंपरांवर आधारित केवळ संगीताला समर्पित स्टार्टअप्स निर्माण करण्याचे आवाहन केले.
काशीसारख्या संस्कृती आणि कला केंद्रांच्या पुनरुज्जीवनाशी संबंधित अलिकडच्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले की, पर्यावरण संरक्षण आणि निसर्गावरील प्रेमाच्या माध्यमातून भारताने जगाला सुरक्षित भविष्याचा मार्ग दाखवला आहे. “वारसा आणि विकासाच्या भारताच्या या प्रवासात ‘सर्वांच्या प्रयत्नांची जोड मिळायला हवी असे आवाहन त्यांनी केले.
आज पंडित जसराज जी की जन्मजयंती के पुण्य अवसर भी है।
— PMO India (@PMOIndia) January 28, 2022
इस दिन, पंडित जसराज कल्चरल फ़ाउंडेशन की स्थापना के इस अभिनव कार्य के लिए मैं आप सभी को बधाई देता हूँ।
विशेष रूप से मैं दुर्गा जसराज जी और पंडित सारंगदेव जी को शुभकामनाएँ देता हूँ: PM @narendramodi
संगीत एक बहुत गूढ़ विषय है।
— PMO India (@PMOIndia) January 28, 2022
मैं इसका बहुत जानकार तो नहीं हूँ, लेकिन हमारे ऋषियों ने स्वर और नाद को लेकर जितना व्यापक ज्ञान दिया है, वो अद्भुत है: PM @narendramodi
आज के ग्लोबलाइजेशन के जमाने में, भारतीय संगीत भी अपनी ग्लोबल पहचान बनाए, ग्लोबली अपना प्रभाव पैदा करे, ये हम सबका दायित्व है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 28, 2022
जब टेक्नोलॉजी का प्रभाव हर क्षेत्र में है, तो संगीत के क्षेत्र में भी टेक्नोलॉजी और आईटी का रिवॉल्यूशन होना चाहिए।
— PMO India (@PMOIndia) January 28, 2022
भारत में ऐसे स्टार्ट अप तैयार हों जो पूरी तरह संगीत को डेडिकेटेड हों, भारतीय वाद्य यंत्रों पर आधारित हों, भारत के संगीत की परंपराओं पर आधारित हों: PM @narendramodi
विरासत भी, विकास भी के मंत्र पर चल रहे भारत की इस यात्रा में 'सबका प्रयास' शामिल होना चाहिए: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 28, 2022
आज हम काशी जैसे अपनी कला और संस्कृति के केन्द्रों का पुनर्जागरण कर रहे हैं, पर्यावरण संरक्षण और प्रकृति प्रेम को लेकर हमारी जो आस्था रही है, आज भारत उसके जरिए विश्व को सुरक्षित भविष्य का रास्ता दिखा रहा है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 28, 2022