पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 ऑक्टोबर 2024 रोजी कझान येथे 16 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली.
भारत-चीन सीमावर्ती भागात 2020 मध्ये उद्भवलेल्या समस्यांपासून संपूर्ण सुटका आणि निराकरण करण्यासाठी अलीकडील कराराचे स्वागत करताना, पंतप्रधान मोदी यांनी मतभेद आणि विवाद योग्यरित्या हाताळण्याचे आणि शांतता आणि सुव्यवस्था बिघडू न देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्था याबाबत देखरेख करण्यासाठी आणि सीमा प्रश्नावर न्याय्य, वाजवी आणि परस्पर स्वीकारार्ह तोडगा शोधण्यासाठी भारत-चीन सीमाप्रश्नावरील विशेष प्रतिनिधी लवकरात लवकर भेटतील याविषयी उभय नेत्यांनी सहमती दर्शवली. द्विपक्षीय संबंध स्थिर आणि पुनर्स्थापित करण्यासाठी परराष्ट्र मंत्री आणि इतर अधिकाऱ्यांच्या स्तरावरील संबंधित संवाद यंत्रणेचा देखील उपयोग केला जाईल.
दोन शेजारी आणि पृथ्वीवरील दोन सर्वात मोठी राष्ट्रे या नात्याने भारत आणि चीन यांच्यातील स्थिर, अंदाज करण्यायोग्य आणि सौहार्दपूर्ण द्विपक्षीय संबंधांचा प्रादेशिक आणि जागतिक शांतता आणि समृद्धीवर सकारात्मक परिणाम होईल, अशी पुष्टी दोन्ही नेत्यांनी केली. हे संबंध बहु-ध्रुवीय आशिया आणि बहु-ध्रुवीय जगामध्ये देखील योगदान देतील. धोरणात्मक आणि दीर्घकालीन दृष्टीकोनातून द्विपक्षीय संबंधांची प्रगती, धोरणात्मक संवादाला चालना आणि विकासात्मक आव्हानांना तोंड देण्यासाठी सहकार्य शोधण्याची गरज नेत्यांनी अधोरेखित केली.
Click here to read full text speech
Met President Xi Jinping on the sidelines of the Kazan BRICS Summit.
— Narendra Modi (@narendramodi) October 23, 2024
India-China relations are important for the people of our countries, and for regional and global peace and stability.
Mutual trust, mutual respect and mutual sensitivity will guide bilateral relations. pic.twitter.com/tXfudhAU4b