पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 ऑगस्ट 2023 रोजी जोहान्सबर्ग येथे 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने सेनेगल प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष मॅकी साल यांची भेट घेतली.
व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, ऊर्जा, खाणकाम, कृषी, औषधनिर्माण, रेल्वे, क्षमता निर्माण, सांस्कृतिक आणि उभय देशातील लोकांचे परस्परातील संबंध यासह विविध क्षेत्रात द्विपक्षीय भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या मार्गांवर दोन्ही नेत्यांनी फलदायी चर्चा केली.
गेल्या वर्षी ग्लोबल साऊथ समिटमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आणि आफ्रिकी संघामधील त्यांच्या सक्षम नेतृत्वाबद्दल राष्ट्राध्यक्ष साल यांचे पंतप्रधानांनी कौतुक केले.
चांद्रयान मोहिमेच्या यशाबद्दल राष्ट्राध्यक्ष साल यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले आणि जी20 मध्ये आफ्रिकी महासंघाच्या स्थायी सदस्यत्वासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विकसनशील देशांच्या प्राधान्यक्रमांना पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधानांच्या नेतृत्वाचीही त्यांनी प्रशंसा केली आणि भारताच्या अध्यक्षतेखालील जी20 शिखर परिषदेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.
Held talks with President @Macky_Sall in Johannesburg. India considers Senegal to be a valued developmental partner. We discussed sectors like energy, infrastructure, defence and more in our meeting. pic.twitter.com/keoZjjnjZg
— Narendra Modi (@narendramodi) August 24, 2023