पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरोशिमा येथील जी -7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर कोरिया प्रजासत्ताकचे अध्यक्ष  यून सुक येओल यांची  20 मे 2023 रोजी भेट घेतली.

दोन्ही नेत्यांनी भारत आणि कोरिया प्रजासत्ताक यांच्यातील भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि व्यापार आणि गुंतवणूक, उच्च तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर उत्पादन, संरक्षण, सेमी कंडक्टर्स आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठीच्या उपाययोजनांवर विचारविनिमय केला.

या वर्षी दोन्ही देश त्यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा 50 वा वर्धापन दिन साजरा करत आहेत असे या नेत्यांनी सांगितले आणि परस्पर सहकार्य आणखी वाढविण्यावर सहमती दर्शवली.

कोरिया प्रजासत्ताकचे अध्यक्ष यून सुक येओल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची  जी 20 परिषदेच्या अध्यक्षतेसाठी प्रशंसा केली आणि आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला. या वर्षी सप्टेंबरमध्ये जी 20 नेत्यांच्या शिखर परिषदेसाठी राष्ट्रपती यून यांच्या भारत भेटीची वाट पाहत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

कोरिया प्रजासत्ताची  हिंद  प्रशांत रणनीती आणि कोरिया भारताला देत असलेल्या महत्वाचे पंतप्रधानांनी स्वागत केले.

दोन्ही नेत्यांमध्ये  प्रादेशिक घडामोडींवरही सकारात्मक विचार मंथन झाले. 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi