दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर , कोपनहेगन येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आईसलँडच्या पंतप्रधान महामहिम कॅटरिन जेकोब्सडोटीर यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक झाली.
एप्रिल 2018 मध्ये स्टॉकहोम येथे झालेल्या पहिल्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेदरम्यान झालेल्या त्यांच्या पहिल्या भेटीचे दोन्ही पंतप्रधानांनी स्मरण केले. या वर्षी उभय देश राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा 50 वा वर्धापन दिन साजरा करत आहेत, हे या बैठकीदरम्यान त्यांनी नमूद केले.
उभय नेत्यांनी विशेषत: भू-औष्णिक ऊर्जा, नील अर्थव्यवस्था , अतिशीत प्रदेश , नवीकरणीय ऊर्जा, मत्स्यपालन, अन्न प्रक्रिया, डिजिटल विद्यापीठे आणि संस्कृतीसह शिक्षण.या क्षेत्रांमध्ये आर्थिक सहकार्य आणखी बळकट करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. विशेषतः,भू-औष्णिक ऊर्जा हे आइसलँडचे विशेष प्रावीण्याचे क्षेत्र आहे आणि या क्षेत्रात असलेल्या उभय देशांमधील विद्यापीठांमधील सहकार्यावर दोन्ही बाजूंनी भर देण्यात आला.
लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान जेकोब्सडोटीर यांच्या वैयक्तिक प्रयत्नांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली आणि या संदर्भात त्यांनी भारताच्या प्रगतीबद्दल त्यांना माहिती दिली.
भारत - युरोपीय मुक्त व्यापार संघटना (ईएफटीए ) व्यापार वाटाघाटी जलद करण्यावरही चर्चा झाली.
प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही या बैठकीत चर्चा झाली.
Prime Minister @narendramodi held talks with PM @katrinjak of Iceland. They discussed boosting ties in areas like trade, energy, fisheries and more. pic.twitter.com/kw2koKnm9t
— PMO India (@PMOIndia) May 4, 2022