पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 ऑगस्ट 2023 रोजी अथेन्समध्ये ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांची भेट घेतली.
उभय नेत्यांनी स्वतः परस्परांशी आणि शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली.ग्रीसमधील जंगलात लागलेल्या आगीच्या दुःखद घटनांमध्ये झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले.
पंतप्रधान मित्सोटाकिस यांनी चांद्रयान मोहिमेच्या यशाबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन केले आणि हे मानवतेसाठीचे यश असल्याचे सांगितले.
व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, डिजिटल पेमेंट्स, नौवहन, औषध उत्पादन, कृषी, स्थलांतर आणि वाहतूक , पर्यटन, कौशल्य विकास, संस्कृती, शिक्षण आणि लोकांशी लोकांचे असलेले परस्पर संबंध यासह द्विपक्षीय सहकार्याच्या विविध पैलूंवर यावेळी चर्चा करण्यात आली. दोन्ही नेत्यांनी युरोपियन युनियन , हिंद- प्रशांत आणि भूमध्य सागरी क्षेत्रासह प्रादेशिक आणि बहुपक्षीय मुद्द्यांवरही चर्चा केली. आंतरराष्ट्रीय कायदा, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
दोन्ही देशांमधील संबंध ‘धोरणात्मक सहकार्य' च्या स्तरावर नेण्यासाठी उभय नेत्यांनी सहमती दर्शवली.
Held very fruitful talks with @PrimeministerGR @kmitsotakis in Athens. We have decided to raise our bilateral relations to a ‘Strategic Partnership’ for the benefit of our people. Our talks covered sectors such as defence, security, infrastructure, agriculture, skills and more. pic.twitter.com/guOk4Byzqk
— Narendra Modi (@narendramodi) August 25, 2023