पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 मे 2023 रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे ऑस्ट्रेलियन सुपरचे मुख्य कार्यकारी पॉल श्रोडर यांची भेट घेतली.
परकीय गुंतवणुकीसाठी जगातील सर्वात पसंतीची प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताची ओळख असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि ऑस्ट्रेलियनसुपरला भारतासोबत काम करण्यासाठी आमंत्रित केले.
ऑस्ट्रेलियनसुपर हा एक ऑस्ट्रेलियन निवृत्तीवेतन निधी आहे. त्याचे मुख्यालय मेलबर्नमधील व्हिक्टोरिया येथे आहे.