'सबका साथ, सबका विकास' या मंत्राने भाजप देशातील जनतेची सेवा करत राहील, असे पंतप्रधान मोदींनी आज एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, "विजय एखाद्याच्या डोक्यात जाऊ नयेत यासाठी कार्यकर्त्यांसोबत देशाची सेवा केल्याने मला या देशाच्या कोणत्याही सामान्य माणसासारखेच असल्याची जाणीव होते, हे महत्वाचे आहे."

सध्याचे सरकार धोरणांचे श्रेय लाटत असल्याचा विरोधकांचा दावा आहे, या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “या प्रश्नाने मला नेहमीच आनंद होतो कारण, माझा विश्वास आहे की जेव्हा जेव्हा विरोधक आमच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते धोरण प्रभावी आहे आणि योग्यरीत्या अंमलात येत आहे, असाच अर्थ त्यातून निघतो”. उत्तर प्रदेशच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “यूपीमधील गुन्हेगार राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर सत्ता गाजवत होते, परंतु आज यूपीच्या मुलीही दिवसाच्या कोणत्याही वेळी निर्धास्तपणे फिरू शकतात. योगीजींनी राज्यात सुरक्षा आणि सुरक्षेला महत्त्व दिले आहे.”

भाजपच्या एका खासदाराच्या नातेवाईकाने केलेल्या कथित गुन्हयाबद्दल कायद्याशी एकनिष्ठ राहण्याच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “या देशाची न्यायव्यवस्था जिवंत आणि सक्रिय आहे, या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समित्यांच्या अनुषंगाने आम्ही योग्य पावले उचलली असून सर्व गोष्टींचे कायद्यानुसारच पालन केले जाईल, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

डबल इंजिन सरकारच्या यशाबद्दल आणि 'डबल-इंजिन सरकार' नसलेल्या सरकारांना असे यश न मिळाल्याबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “जेव्हा जेव्हा लोकांच्या हितापेक्षा वैयक्तिक फायद्यासाठी राजकारणाला प्राधान्य दिले जाते, तेव्हा राज्य विकास आणि प्रगतीच्या बाबतीत पिछाडीवर जाणे क्रमप्राप्त असते. जीएसटीचे उदाहरण देताना पंतप्रधान म्हणाले की, पूर्वीच्या राज्यांच्या विशिष्ट प्रचलित धोरणांऐवजी आता संपूर्ण भारतभर कर आकारणीत समानता आणल्यामुळे आज व्यवसायातील वातावरण सुरळीत आहे.

प्रादेशिक आशा आकांक्षा जपण्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “देशाच्या प्रगतीसाठी प्रादेशिक आकांक्षा पूर्ण करण्यावर भारतीय जनता पक्षाचा विश्वास आहे. प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री राहिल्यामुळे मला राज्याच्या आकांक्षा आणि गरजांची जाणीव आहे. आमच्या सरकारने महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांची निवड केली असून त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. काही जिल्ह्यांनी अनेक बाबतीत राज्याची सरासरी आकडेवारी ओलांडली आहे.” 

पंतप्रधान मोदींनी धोरणे ठरवताना केले जाणारे जात आणि धर्माचे राजकारण या मुद्द्यालाही स्पर्श केला. “मी मुख्यमंत्री असताना आम्ही ओबीसी प्रवर्गात लाभ मिळालेला अल्पसंख्याक समाज निश्चित केला होता. सर्वसमावेशकतेच्या या प्रयोगाद्दल आजपर्यंत कोणीही बोलले नाही, परंतु लोक खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल करत निवडणुकीच्या उमेदवारीवरून राजकारण करत आहेत. याचा परिणाम की काही लोक भारतात अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत असे सांगण्यात होतो.” 

विरोधकांच्या बेगडी समाजवादी विचारसरणीबद्दल बोलताना, पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी नेहमीच म्हणत आलो आहे की ‘व्यवसाय करणे हे काही सरकारचे काम नाही’ आणि अशा प्रकारे सरकारने देशाच्या कल्याणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. बनावट समाजवादाच्या बुरख्याआड लपलेल्या विशिष्ट ‘परिवारवादा’ची ही समस्या आहे.”

जेव्हा मी नकली समाजवाद असे म्हणतो तेव्हा मला परिवारवाद हा अर्थ मला अभिप्रेत असतो. राम मनोहर लोहियाजींचे कुटुंब आपल्याला कुठेतरी दिसते का? ते समाजवादी होते. जॉर्ज फर्नांडिस यांचे कुटुंबिय कुठे दिसतात? ते सुद्धा समाजवादी होते. नीतिश कुमारजींच्या कुटुंबाला तुम्ही कुठे पाहिलं आहे? ते देखील समाजवादी आहेत, असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.

रद्द केलेल्या कृषी कायद्यांविषयी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, अल्पभूधारकांच्या समस्या आम्ही जाणतो. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कृषी कायदे आणले गेले होते, पण राष्ट्रहित लक्षात घेऊन ते मागे घेण्यात आले आहेत.

देशातील महामारीच्या स्थितीवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोविड-19 महामारीबाबत सतर्क राहण्याचे मी लोकांना नेहेमीच आवाहन करत आलो आहे. हा विषाणू अत्यंत बेभरवशाचा आहे आणि त्याचा आपल्या देशात कमीत कमी परिणाम व्हावा यासाठी आपण सतत प्रयत्नशील असले पाहिजे. पण समस्या अशी आहे की, काही राजकीय पक्ष महामारीविरोधात देशाची सज्जता डळमळीत करण्यासाठी भीती पसरवण्यात भूमिका बजावत आहेत.   

पंजाबमधील आगामी निवडणुकांविषयी पंतप्रधान मोदी म्हणाले की अस्थिरता दूर करून शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी आम्ही कायमच झटत असतो, अशाप्रकारे आम्हाला पंजाबमध्येही शांतता आणायची आहे. पंजाबसाठीच्या आमच्या संकल्पांवर विश्र्वास दाखवून अनेक अभ्यासू आणि अनुभवी नेत्यांनी आमच्याशी हातमिळवणी केली आहे. माझे पंजाबशी खास नाते आहे. या राज्यात मी यापूर्वी वास्तव्य आणि लोकसेवा केलेली असल्याने पंजाबच्या जनतेच्या शुद्ध अंतःकरणाचा अनुभव मी घेतलेला आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world

Media Coverage

PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi