पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-7 शिखर परिषदेसाठीच्या हिरोशिमा भेटीदरम्यान जपानी मान्यवर टोमियो मिझोकामी आणि हिरोको ताकायामा यांची भेट घेतली. या मान्यवरांनी आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
टोमियो मिझोकामी, ओसाका विद्यापीठात प्राध्यापक आहेत. प्रसिद्ध लेखक आणि भाषाशास्त्रज्ञही असून हिंदी आणि पंजाबी भाषांमध्ये ते निपुण आहेत. परराष्ट्र अभ्यास हा त्यांच्या अध्यापनाचा विषय आहे. जपानमध्ये भारतीय साहित्य आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे "ज्वालामुखी" हे पुस्तक प्रसिद्ध आहे - जपानमध्ये हिंदी शिक्षणाचा पाया घातलेल्या 1980 च्या दशकातील जपानी विद्वानांनी लिहिलेल्या काव्यसंग्रहाचे हे संकलन आहे.
हिरोशिमा येथे जन्मलेल्या हिरोको ताकायामा या पाश्चात्य शैलीतील चित्रकार आहेत. भारतासोबत दोन दशकांहून अधिक काळ असलेल्या त्यांच्या दृढ संबंधाचा त्यांच्या कलाकृतींवर खूप प्रभाव आहे. त्यांनी भारतात अनेक कार्यशाळा आणि प्रदर्शने आयोजित केली आहेत. विश्व भारती विद्यापीठ, शांती निकेतन येथे काही काळ त्या अतिथी प्राध्यापकही होत्या. ताकायामा यांनी यावेळी पंतप्रधानांना त्यांच्या प्रमुख कामांपैकी असलेले - 2022 मध्ये तयार केलेले भगवान बुद्धांचे तैलचित्र भेट दिले.
अशा संवादांमुळे परस्पर सामंजस्य, आदर वाढतो आणि उभय देशांमधे मजबूत बंध निर्माण होतात असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी संबंध अधिक दृढ करण्याचा मार्ग मोकळा करणार्या अशा समृद्ध देवाणघेवाणीसाठी अशा आणखी संधी उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
インドとの深い絆を持つアーティスト、高山博子さんにお会いしました。高山さんは印日の文化的な関係を強化するために幅広く活躍しています。自分のアートワークを私にプレゼントしてくださいました。 pic.twitter.com/kfEy1aauFj
— Narendra Modi (@narendramodi) May 20, 2023
Met Ms. Hiroko Takayama, a respected artist who has a close association with India. She has worked extensively on enhancing the cultural bonds between India and Japan. She also presented her artwork to me. pic.twitter.com/tXTHlQb2yC
— Narendra Modi (@narendramodi) May 20, 2023
広島で、溝上富夫教授と交流できたことを嬉しく思います。パドマ賞受賞者であり、ヒンディー語、パンジャブ語の著名な言語学者である溝上教授は、インドの文化や文学を日本の人々に親しんでもらうために、数々の取り組みをされています。 pic.twitter.com/BmsoQGJamT
— Narendra Modi (@narendramodi) May 20, 2023
In Hiroshima, I was glad to interact with Professor Tomio Mizokami. A Padma Awardee, he is a distinguished Hindi and Punjabi linguist. He has made numerous efforts to make Indian culture and literature popular among the people of Japan. pic.twitter.com/mEWYZLr62F
— Narendra Modi (@narendramodi) May 20, 2023