QuoteIn the last 8 years, we have made our democracy strong and resilient: PM Modi
QuoteJapan is an important partner in building infrastructure & manufacturing capacity in India: PM Modi
QuoteIndia is optimistic about a tech-led, science-led, innovation-led and talent-led future: PM Modi

जपानमधील भारतीय समुदायाच्या 700 पेक्षा अधिक सदस्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 मे 2022 रोजी संवाद साधला.

|

या कार्यक्रमापूर्वी, पंतप्रधानांनी भारत आणि जपानदरम्यान सांस्कृतिक आणि सामाजिक देवाणघेवाण करण्यास प्रोत्साहनपर काम करणाऱ्या व्यक्तींच्या भेटी घेतल्या. यामध्ये इंडोलॉजिस्ट म्हणजे भारताच्या इतिहास-संस्कृती-तत्त्वज्ञान आदींचा अभ्यास करणारे लोक, खेळाडू आणि कलाकार यांचा समावेश होता. तसेच जपानमधील 'प्रवासी (अनिवासी) भारतीय पुरस्कार' विजेत्या लोकांच्या भेटीही त्यांनी घेतल्या. जपानमधील भारतीय समुदायात चाळीस हजारापेक्षा अधिक लोकांचा समावेश आहे.

|

भारतीय समुदायाच्या व्यक्तींकडील कौशल्ये, प्रतिभा आणि उद्योजकता या गुणांचे व मातृभूमीशी जिव्हाळ्याचे नाते जपण्याच्या वृत्तीचे पंतप्रधानांनी कौतुक केले. स्वामी विवेकानंद आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे दाखले देऊन पंतप्रधानांनी भारत आणि जपानदरम्यानच्या सखोल सांस्कृतिक संबंधांचे ठाशीवपणे गुणगान केले. तसेच, गेल्या काही वर्षांत भारतात घडून आलेल्या विविध सामाजिक-आर्थिक घडामोडी व सुधारणा- त्यांनी अधोरेखित केल्या. यामध्ये विशेषत्वाने पायाभूत सुविधा, प्रशासन, हरित विकास आणि डिजिटल क्रांती या क्षेत्रांतील प्रगतीचा समावेश होता. 'भारत चलो, भारत से जुडो' म्हणजेच 'भारतात या, भारताशी जोडून घ्या' या मोहिमेत सहभागी होऊन ती पुढे चालविण्याचे आवाहनही त्यांनी भारतीय समुदायाला केले.’

|

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
'Operation Brahma': First Responder India Ships Medicines, Food To Earthquake-Hit Myanmar

Media Coverage

'Operation Brahma': First Responder India Ships Medicines, Food To Earthquake-Hit Myanmar
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 30 मार्च 2025
March 30, 2025

Citizens Appreciate Economic Surge: India Soars with PM Modi’s Leadership