पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 सप्टेंबर 2021 रोजी अमेरिकेत वॉशिंग्टन डीसी येथे क्वाड  नेत्यांच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासोबत  द्विपक्षीय बैठक घेतली.

 

महामारी नंतरच्या काळात दोन्ही     नेत्यांमधील ही पहिलीच प्रत्यक्ष भेट होती.   पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान    मॉरिसन यांच्यातील शेवटची द्विपक्षीय बैठक 4 जून 2020 रोजी झालेली   आभासी शिखर परिषद होती ज्यात  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील   धोरणात्मक भागीदारी  व्यापक     धोरणात्मक भागीदारीमध्ये बदलण्यात आली . 

बैठकीदरम्यान, पंतप्रधानांनी द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक महत्त्वाच्या  मुद्द्यांवर  विस्तृत  चर्चा केली. त्यांनी   नुकत्याच झालेल्या पहिल्या      भारत-ऑस्ट्रेलिया परराष्ट्र आणि संरक्षण   मंत्र्यांच्या 2+2 संवादासह उभय   देशांमधील नियमित   उच्चस्तरीय सहभागाची   समाधानपूर्वक दखल घेतली.

 

प्रधानमंत्र्यांनी व्यापक धोरणात्मक   भागीदारी अंतर्गत जून 2020 मध्ये   उभय नेत्यांच्या आभासी शिखर परिषदेनंतर  साधलेल्या प्रगतीचा आढावा   घेतला आणि परस्पर कल्याणासाठी   दृढ  सहकार्य सुरू ठेवण्याचा आणि   मुक्त, खुला ,  समृद्ध आणि नियमांवर आधारित हिंद-प्रशांत  क्षेत्राच्या सामायिक उद्दिष्टाला पुढे नेण्याचा  संकल्प केला.

|

 द्विपक्षीय व्यापक आर्थिक   सहकार्य करारावर (CECA) सुरू   असलेल्या वाटाघाटींबाबत  पंतप्रधानानी समाधान व्यक्त केले. त्या संदर्भात, त्यांनी   ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी   अबॉट  यांच्या भारत दौऱ्याचे स्वागत केले. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन    भारतासाठी विशेष व्यापार दूत म्हणून आले होते. डिसेंबर 2021 पर्यंत   अंतरिम कराराबाबत लवकर  घोषणा करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी    वचनबद्धता दर्शवली.

 आंतरराष्ट्रीय समुदायाने  हवामान   बदलाच्या समस्येकडे  तातडीने लक्ष   देण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली. या संदर्भात पंतप्रधान मोदींनी पर्यावरण संरक्षणावर व्यापक संवादाची गरजही स्पष्ट केली. दोन्ही   नेत्यांनी स्वच्छ तंत्रज्ञान पुरवण्याच्या   संधींबाबतही चर्चा केली.

 

पंतप्रधानांनी सहमती दर्शवली की   हिंद-प्रशांत  क्षेत्रातील   प्रांतातील दोन  चैतन्यशील लोकशाही म्हणून, दोन्ही देशांनी महामारीनंतरच्या काळातील  जागतिक  आव्हानांवर मात करण्यासाठी एकत्र काम करण्याची    आणि त्याचबरोबर पुरवठा साखळीची लवचिकता वाढवण्याची गरज आहे

 

दोन्ही नेत्यांनी  ऑस्ट्रेलियाच्या  अर्थव्यवस्थेत आणि समाजात  भारतीय समुदायाच्या भरीव  योगदानाची प्रशंसा केली  आणि   लोकांमधील परस्पर संबंध    वाढवण्याच्या उपायांवर  चर्चा केली.

 

पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान मॉरिसन यांना भारत भेटीचे नव्याने आमंत्रण  दिले.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
What Is Firefly, India-Based Pixxel's Satellite Constellation PM Modi Mentioned In Mann Ki Baat?

Media Coverage

What Is Firefly, India-Based Pixxel's Satellite Constellation PM Modi Mentioned In Mann Ki Baat?
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 जानेवारी 2025
January 20, 2025

Appreciation for PM Modi’s Effort on Holistic Growth of India Creating New Global Milestones