दूरचित्रवाणीवरून देशाला संबोधित करतांना केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड महामारीच्या विरोधात देशातील सध्या सुरू असलेल्या लढाईत सर्व नागरिकांना बेपर्वाईने न वागण्याचे आणि आत्मसंतुष्ट न राहण्याचे आवाहन केले.
नरेंद्र मोदी म्हणाले की टाळेबंदी उठवली याचा अर्थ असा नाही की कोरोना विषाणू नष्ट झाला आहे.
देशभरातील परिस्थितीत झालेल्या सुधारणेचे त्यांनी कौतुक केले, आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येत आहेत आणि लोक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी घराबाहेर पडू लागले आहेत..
मोदींनी नमूद केले की सणांच्या निमित्ताने बाजारपेठा देखील सामान्य स्थितीकडे परत येऊ लागल्या आहेत.
ते म्हणाले की, गेल्या 7-8 महिन्यांत प्रत्येक भारतीयांच्या प्रयत्नांमुळे भारत अधिक चांगल्या स्थितीत आहे आणि कुणीही ती बिघडू देऊ नये.
पंतप्रधानांनी नमूद केले की देशात रुग्ण बरे होण्याच्या दरात सुधारणा झाली आहे आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. मोदी म्हणाले की, दर दहा लाख नागरिकांपैकी सुमारे 5500 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर अमेरिका आणि ब्राझीलसारख्या देशांमध्ये ही संख्या जवळपास 25000 इतकी आहे.
पंतप्रधान म्हणाले की भारतात दर दहा लाख नागरिकांमध्ये मृत्यूचे प्रमाण 83 आहे, तर अमेरिका, ब्राझील, स्पेन, ब्रिटनसारख्या प्रगत देशांमध्ये आणि इतर अनेक देशांमध्ये हे प्रमाण जवळपास 600 इतके आहे.
अनेक विकसित देशांच्या तुलनेत देशातील अनेक नागरिकांच्या जीवाचे रक्षण करण्यात भारत यशस्वी होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले.
पंतप्रधानांनी देशातील कोविड पायाभूत सुविधांच्या सुधारणांचा उल्लेख केला. ते म्हणाले की देशभरात 12000 विलगीकरण केंद्रांसह कोरोना रूग्णांसाठी 90 लाखाहून अधिक खाटा उपलब्ध आहेत.
ते म्हणाले, देशभरात 2000 हून अधिक कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत, तर चाचण्यांची संख्या लवकरच 10 कोटींच्या पुढे जाईल.
ते म्हणाले की, संसाधन समृद्ध देशांच्या तुलनेत जास्तीत जास्त नागरिकांचे प्राण वाचवण्यात भारत यशस्वी होत आहे आणि कोविड महामारी विरूद्ध देशाच्या लढाईत चाचण्यांची वाढती संख्या ही मोठी शक्ती आहे.
“सेवा परमो धर्म” या मंत्राचा अवलंब करून नि: स्वार्थपणे मोठ्या प्रमाणात लोकांची सेवा करणारे डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी यांच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले.
या सर्व प्रयत्नांमध्येही त्यांनी जनतेला बेसावध न राहण्याचा आणि कोरोना विषाणूचा नाश झाला आहे, किंवा आता कोरोनाकडून कोणताही धोका नाही असा समज करून न घेण्याचा इशारा त्यांनी दिला.
करोना नियंत्रण प्राथमिक उपायांचा अंगीकार न करणार्या नागरिकांना उदे्शुन ते म्हणाले की, "जर तुम्ही कुटुंबासाठी खबरदारी घेतली नाही, म्हणजे मास्क न लावता बाहेर जात असाल, सामाजिक अंतर पाळत नसाल तर तुम्ही स्वत: ला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या मुलांना, वृद्धांनाही तितकेच जोखीम दाखवत आहात.”
पंतप्रधानांनी अमेरिका आणि युरोपमधील सध्या सुरू असलेल्या परिस्थितीचा उल्लेख केला जेथे कोरोनाची घटना सुरुवातीला कमी झाली पण नंतर अचानक वाढू लागली.
आज अमेरिका असो, किंवा मग युरोपातील इतर देश, या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होत होते, मात्र अचानक त्यांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे आणि ही वाढ चिंताजनक आहे.
महामारीवर लस सापडल्याशिवाय निष्काळजीपणा करू नये आणि कोविड-19 विरुद्धचा लढा कमकुवत होऊ देऊ नये, असे त्यांनी आवाहन केले.
पंतप्रधान म्हणाले की, मानवतेला वाचविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत आणि देशाच्या वैज्ञानिकांसह अनेक देश लसीच्या निर्मितीवर काम करत आहेत.
ते म्हणाले की कोरोनाविरूद्ध विविध लसींवर काम सुरू असून त्यातील काही प्रगत अवस्थेत आहेत.
पंतप्रधान म्हणाले की, ही लस त्वरित उपलब्ध होताच प्रत्येक नागरिकापर्यंत पोचवण्यासाठी सरकार सविस्तर आराखडा तयार करत आहे.
लस तयार होईपर्यंत बेपर्वाईने न वागण्याचे त्यांनी आवाहन केले.
पंतप्रधान म्हणाले की आपण कठीण परिस्थितीतून जात आहोत आणि थोडीशी निष्काळजीपणा एक मोठे संकट निर्माण करू शकते आणि आपल्या आनंदावर विरजण घालू शकते.
नागरिकांनी त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडतांना जागरुक राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
नागरिकांनी सहा फूट अंतर (दो गज की दूरी) राखावे , वेळोवेळी साबणाने हात धुवावेत आणि मास्क घालावा असे आवाहन त्यांनी केले.
कोरोना के खिलाफ लड़ाई में जनता कर्फ्यू से लेकर आज तक हम भारतवासियों ने बहुत लंबा सफर तय किया है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 20, 2020
समय के साथ आर्थिक गतिविधियां भी तेजी से बढ़ रही हैं। हम में से अधिकांश लोग, अपनी जिम्मेदारियों को निभाने के लिए, फिर से जीवन को गति देने के लिए, रोज घरों से बाहर निकल रहे हैं। त्योहारों के इस मौसम में बाजारों में भी रौनक धीरे-धीरे लौट रही है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 20, 2020
लेकिन हमें ये भूलना नहीं है कि लॉकडाउन भले चला गया हो, वायरस नहीं गया है। बीते 7-8 महीनों में, प्रत्येक भारतीय के प्रयास से, भारत आज जिस संभली हुई स्थिति में हैं, हमें उसे बिगड़ने नहीं देना है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 20, 2020
आज देश में रिकवरी रेट अच्छी है, Fatality Rate कम है।
— PMO India (@PMOIndia) October 20, 2020
दुनिया के साधन-संपन्न देशों की तुलना में भारत अपने ज्यादा से ज्यादा नागरिकों का जीवन बचाने में सफल हो रहा है।
कोविड महामारी के खिलाफ लड़ाई में टेस्ट की बढ़ती संख्या हमारी एक बड़ी ताकत रही है: PM @narendramodi
सेवा परमो धर्म: के मंत्र पर चलते हुए हमारे doctors, nurses, health workers इतनी बड़ी आबादी की निस्वार्थ सेवा कर रहे हैं। इन सभी प्रयासों के बीच, ये समय लापरवाह होने का नहीं है। ये समय ये मान लेने का नहीं है कि कोरोना चला गया, या फिर अब कोरोना से कोई खतरा नहीं है: PM Modi
— PMO India (@PMOIndia) October 20, 2020
हाल के दिनों में हम सबने बहुत सी तस्वीरें, वीडियो देखे हैं जिनमें साफ दिखता है कि कई लोगों ने अब सावधानी बरतना बंद कर दिया है। ये ठीक नहीं है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 20, 2020
अगर आप लापरवाही बरत रहे हैं, बिना मास्क के बाहर निकल रहे हैं, तो आप अपने आप को, अपने परिवार को, अपने परिवार के बच्चों को, बुजुर्गों को उतने ही बड़े संकट में डाल रहे हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 20, 2020
आप ध्यान रखिए, आज अमेरिका हो, या फिर यूरोप के दूसरे देश, इन देशों में कोरोना के मामले कम हो रहे थे, लेकिन अचानक से फिर बढ़ने लगे: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 20, 2020
जब तक सफलता पूरी न मिल जाए, लापरवाही नहीं करनी चाहिए।
— PMO India (@PMOIndia) October 20, 2020
जब तक इस महामारी की वैक्सीन नहीं आ जाती, हमें कोरोना से अपनी लड़ाई को कमजोर नहीं पड़ने देना है: PM @narendramodi
बरसों बाद हम ऐसा होता देख रहे हैं कि मानवता को बचाने के लिए युद्धस्तर पर काम हो रहा है। अनेक देश इसके लिए काम कर रहे हैं। हमारे देश के वैज्ञानिक भी vaccine के लिए जी-जान से जुटे हैं। भारत में अभी कोरोना की कई वैक्सीन्स पर काम चल रहा है। इनमें से कुछ एडवान्स स्टेज पर हैं: PM Modi
— PMO India (@PMOIndia) October 20, 2020
कोरोना की vaccine जब भी आएगी, वो जल्द से जल्द प्रत्येक भारतीय तक कैसे पहुंचे इसके लिए भी सरकार की तैयारी जारी है। एक-एक नागरिक तक vaccine पहुंचे, इसके लिए तेजी से काम हो रहा है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 20, 2020
याद रखिए, जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 20, 2020
एक कठिन समय से निकलकर हम आगे बढ़ रहे हैं, थोड़ी सी लापरवाही हमारी गति को रोक सकती है, हमारी खुशियों को धूमिल कर सकती है। जीवन की ज़िम्मेदारियों को निभाना और सतर्कता ये दोनो साथ साथ चलेंगे तभी जीवन में ख़ुशियाँ बनी रहेंगी: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 20, 2020
दो गज की दूरी, समय-समय पर साबुन से हाथ धुलना और मास्क का ध्यान रखिए: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 20, 2020