खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी आपला संदेश दिला. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आज बंगळूरु येथे या क्रीडा स्पर्धा सुरू होत असल्याची घोषणा केली. यावेळी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक उपस्थित होते.
बंगळूरु ही देशातील तरुणाईच्या उत्साहाचे प्रतीक आहे आणि व्यावसायिकांचा मानबिंदू आहे, असे पंतप्रधान म्हणाले. या ठिकाणी स्टार्ट अप्स आणि खेळ यांचा होणारा संगम अतिशय महत्त्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले. खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांच्या आयोजनामुळे या सुंदर शहराच्या उर्जेत भर पडेल असे ते म्हणाले. महामारीच्या आव्हानांना तोंड देत या स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या आयोजकांच्या निर्धार आणि क्रीडाप्रेमाला पंतप्रधानांनी सलाम केला. तारुण्याचा हा जोष भारताला प्रत्येक क्षेत्रात चालना देत आहे, असे त्यांनी नमूद केले.
यशाचा पहिला मंत्र म्हणून संघभावनेचे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आपल्याला खेळातून संघभावना शिकता येते.. खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये तुम्हाला याचा थेट अनुभव येईल. ही संघभावना आपल्याला जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन मार्ग देखील देते, असे पंतप्रधान म्हणाले. त्याचप्रकारे, खेळातील यशासाठी सर्वांगीण दृष्टिकोन आणि 100 टक्के समर्पित वृत्ती ही गुरुकिल्ली आहे. क्रीडा क्षेत्रातील क्षमता आणि शिकण्याची वृत्ती देखील एखाद्याला आयुष्यात पुढे घेऊन जाते. “खेळ, खऱ्या अर्थाने, जीवनाला पाठबळ देणारी वास्तविक प्रणाली आहे”, यावर मोदींनी भर दिला. यावेळी पंतप्रधानांनी खेळ आणि जीवन यामध्ये असलेल्या ध्यास, आव्हाने, पराभवातून धडा घेणे, एकात्मता आणि जीवनात टिकून राहण्याची क्षमता विविध पैलूंसंदर्भातल्या समानतांकडे लक्ष वेधले. विजयाचा आनंद योग्य प्रकारे साजरा करणे आणि पराभवातून धडा घेणे या कला आपल्याला क्रीडा क्षेत्रातून शिकता येतात, असे ते म्हणाले.
खेळाडू हे नव्या भारताचे युवा आहेत आणि एक भारत श्रेष्ठ भारतचे ध्वजवाहक देखील आहेत, असे पंतप्रधानांनी खेळाडूंना सांगितले. युवा विचारसरणी आणि दृष्टीकोन आज देशाच्या धोरणांना आकार देत आहेत, असे त्यांनी सांगितले. आजच्या तरुणाईने तंदुरुस्ती हा देशाच्या प्रगतीचा मंत्र बनवला आहे, असे त्यांनी नमूद केले. क्रीडा क्षेत्रात सुरू केलेले अनेक नवे उपक्रम या क्षेत्राला जुनाट विचारसरणीच्या बंधनातून मुक्त करत आहेत, असे त्यांनी सांगितले. नव्या शिक्षण धोरणात खेळांवर दिलेला भर, खेळांसाठी आधुनिक पायाभूत सुविधा, पारदर्शक निवड प्रक्रिया किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर ही नव्या भारताची ओळख अतिशय झपाट्याने तयार होऊ लागली आहे. युवा वर्गाच्या आशा आणि आकांक्षा, नव्या भारताच्या निर्णयांचा पाया त्यावर आधारित आहे. आता देशात नवी क्रीडा विज्ञान केंद्रे स्थापन होऊ लागली आहेत. समर्पित क्रीडा विद्यापीठे स्थापन होत आहेत. हे सर्व तुमच्या सोयीसाठी आणि तुमची स्वप्ने साकार करण्यासाठी आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी यावेळी क्रीडा उर्जा आणि देशाची उर्जा यांचा संबंध स्पष्ट केला. क्रीडा क्षेत्रातील बहुमानामुळे देशाचा बहुमान देखील वाढतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. टोक्यो ऑलिंपिक पथकाशी झालेल्या त्यांच्या भेटी आणि या खेळाडूंच्या चेहऱ्यावर देशासाठी काही तरी केल्याची भावना आणि समाधान आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आलेली चमक यांच्या आठवणींना पंतप्रधानांनी उजाळा दिला. या स्पर्धांमध्ये सहभागी होत असताना देशासाठी खेळण्याची महत्त्वाकांक्षा बाळगण्याचे आवाहन पंतप्रधानांनी या खेळाडूंना केले.
खेलो इंडिया यूनिवर्सिटी गेम्स के लिए आप सभी को बहुत बहुत बधाई।
— PMO India (@PMOIndia) April 24, 2022
बेंगलुरू शहर देश के युवा जोश की पहचान है।
बेंगलुरू प्रोफेशनल्स की शान है।
डिजिटल इंडिया वाले बेंगलुरू में खेलो इंडिया का आह्वान अहम है।
स्टार्ट-अप्स की दुनिया में स्पोर्ट्स का ये संगम, अद्भुत है: PM @narendramodi
बेंगलुरू में खेलो इंडिया यूनिवर्सिटी गेम्स का होना, इस खूबसूरत शहर की एनर्जी को और बढ़ाएगा।
— PMO India (@PMOIndia) April 24, 2022
मैं कर्नाटका सरकार को इन खेलों के आयोजन के लिए बधाई देता हूँ।
ग्लोबल पेंडेमिक की तमाम चुनौतियों के बीच ये खेल, भारत के युवाओं के दृढ़ संकल्प और जज़्बे का उदाहरण है: PM @narendramodi
बेंगलुरू में खेलो इंडिया यूनिवर्सिटी गेम्स का होना, इस खूबसूरत शहर की एनर्जी को और बढ़ाएगा।
— PMO India (@PMOIndia) April 24, 2022
मैं कर्नाटका सरकार को इन खेलों के आयोजन के लिए बधाई देता हूँ।
ग्लोबल पेंडेमिक की तमाम चुनौतियों के बीच ये खेल, भारत के युवाओं के दृढ़ संकल्प और जज़्बे का उदाहरण है: PM @narendramodi
सफल होने का पहला मंत्र होता है- टीम स्पिरिट!
— PMO India (@PMOIndia) April 24, 2022
स्पोर्ट्स से हमें यही टीम स्पिरिट सीखने को मिलती है।
खेलो इंडिया यूनिवर्सिटी गेम्स में भी आप इसे साक्षात अनुभव करेंगे।
यही टीम स्पिरिट आपको जिंदगी को देखने का एक नया नज़रिया भी देती है: PM @narendramodi
स्पोर्ट्स और लाइफ, दोनों में जज्बे का, जोश का, passion का महत्व है।
— PMO India (@PMOIndia) April 24, 2022
स्पोर्ट्स और लाइफ, दोनों में जो चुनौतियों को गले लगाता है, वो विजेता होता है।
स्पोर्ट्स और लाइफ, दोनों में हार भी जीत होती है, हार भी सीख होती है: PM @narendramodi
भारत के युवाओं की आकांक्षाएं, उनकी आशाएं, नए भारत के निर्णयों का आधार बन रही हैं।
— PMO India (@PMOIndia) April 24, 2022
अब देश में नए Sports Science Centres स्थापित हो रहे हैं।
अब देश में dedicated sports universities बन रही हैं।
ये आपकी सहूलियत के लिए है, आपके सपनों को पूरा करने के लिए है: PM @narendramodi