पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या भाषणामध्ये केलेल्या घोषणांवर आधारित विविध योजनांसंदर्भातल्या प्रगतीचा पंतप्रधानांनी आढावा घेतला.
पंतप्रधानांनी ‘2 कोटी लखपती दीदी’ बनवण्याविषयी उल्लेख केला होता. या योजनेनुसार स्वयंसहाय्यता गट आणि अंगणवाड्यांशी जोडलेल्या 2 कोटी महिलांना लखपती बनवण्याविषयी त्यांनी भाष्य केले होते. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी नियोजित विविध उपजीविका विषयक उपायांचा त्यांनी आढावा घेतला.
आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधानांनी 15,000 महिला बचत गटांना शेती आणि संबंधित कामांसाठी ड्रोनने सुसज्ज करण्याविषयी घोषणा केली होती. ही योजना लागू करण्याच्या दिशेने महिला बचत गटांना प्रशिक्षण देण्यापासून ते क्रियाकलापांच्या देखरेखीपर्यंतच्या योजनांची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली.
सर्व सामान्यांना परवडणा-या दरामध्ये औषधांची विक्री करणाऱ्या देशभरातील जनऔषधी दुकानांची संख्या 10,000 वरून 25,000 करण्याबाबतही पंतप्रधानांनी सांगितले होते. या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी या विस्तार कामाच्या अंमलबजावणी धोरणाचा आढावा घेतला.