पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड-19 च्या परिस्थितीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी कोविड विरूद्धच्या लढाईत सरकारने केलेल्या प्रयत्नांची रूपरेषा सांगितली. देशातील लसीकरण मोहिमेतील प्रगतीचा आढावाही त्यांनी सादर केला. केंद्रीय आरोग्य सचिवांनी देशातील कोविड परिस्थितीविषयी सादरीकरण केले आणि सध्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळत असलेल्या राज्यांना लक्ष द्यायला सांगितले आणि या राज्यांमध्ये चाचण्या वाढवण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी देशातील लसीचे उत्पादन आणि पुरवठ्याचा तपशीलही सामायिक केला.
विषाणूविरोधात सामूहिक लढ्याचे नेतृत्व केल्याबद्दल सर्व मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. त्यांनी त्यांच्या राज्यातील कोविड परिस्थितीबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की लसीकरण मोहीम वेळेवर सुरू केल्याने लाखो लोकांचे प्राण वाचू शकले. लस घेण्याबाबत संकोच आणि लसीचा अपव्यय या बाबींवरही चर्चा झाली.
पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसमोर काही स्पष्ट तथ्ये मांडली.
एक, देशाने पहिल्या लाटेतील रुग्णसंख्येची सर्वोच्च स्थिती पार केली आहे आणि वाढीचा दर पूर्वीच्या तुलनेत यावेळी खूप वेगवान आहे. दुसरे म्हणजे, महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब, मध्य प्रदेश आणि गुजरात यासह अनेक राज्यांनी पहिल्या लाटेतील सर्वोच्च संख्या ओलांडली आहे. इतर बरीच राज्ये त्या दिशेने वाटचाल करत आहेत. ही गंभीर चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले. तीन, या वेळी काही राज्यात लोक बरेच हलगर्जीपणे वागताना दिसत आहेत, अगदी प्रशासनही. अशा परिस्थितीत रुग्णसंख्येत तीव्र वाढ झाल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.
मात्र पंतप्रधानांनी आवाहन केले की आव्हाने असूनही आपल्याकडे अधिक चांगला अनुभव, संसाधने आणि लसदेखील आहे. मेहनती डॉक्टर आणि आरोग्य सेवा कर्मचार्यांसह लोकांच्या सहभागाने परिस्थिती व्यवस्थापनात बराच हातभार लावला आहे आणि ते अद्यापही सुरु आहे .
पंतप्रधान म्हणाले, “आपण 'टेस्ट, ट्रॅक, ट्रीट', कोविड योग्य वर्तन आणि कोव्हिड व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे." पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले की विषाणूला रोखण्यासाठी चाचणी करून घेणे व रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे खूप महत्वाचे आहे. पंतप्रधानांनी स्पष्ट सांगितले की समाजातील संसर्गाचे प्रमाण शोधण्यासाठी आणि ज्यांच्यामुळे संक्रमण पसरू शकते अशा लोकांची ओळख पटवण्यासाठी चाचणी करणे आवश्यक आहे: सकारात्मकता दर 5% किंवा त्याहून कमी करण्याच्या उद्देशाने दररोज घेतल्या जाणार्या चाचण्यांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची गरज आहे. प्रतिबंधित क्षेत्र आणि अशा ठिकाणे जेथे मोठ्या संख्येने रुग्णसंख्या नोंदली जात आहेत तिथे केंद्रित आणि लक्ष्यित चाचणीवर भर दिला जाईल. आरटी-पीसीआर चाचणीच्या पायाभूत सुविधा वाढवून एकूण चाचण्यांच्या किमान 70% पर्यंत आरटी-पीसीआर चाचण्या करण्यावर त्यांनी भर दिला
पुरेसे प्रतिबंधात्मक उपाय नसतानाही प्रत्येक सकारात्मक रुग्णात इतरांमध्ये विषाणूचा प्रसार करण्याची क्षमता आहे हे लक्षात घेऊन, संपर्कात आलेल्यांचा शोध आणि समाजातील संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण कृती म्हणून पाठपुरावा करण्यावर चर्चा झाली. पंतप्रधान म्हणाले की बाधित रुग्णांचे किमान 30 संपर्क शोधले पाहिजेत, चाचणी करून त्यांना शक्यतो पहिल्या 72 तासांच्या आत विलगीकरणात ठेवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमा स्पष्ट असाव्यात. पंतप्रधान म्हणाले की, वर्षभर सुरु असलेल्या ‘कोविडविरोधातील लढाईमुळे थकायला झाले असले तरी आपल्या प्रयत्नात कोणत्याही प्रकारची शिथिलता येऊ देऊ नये. त्यांनी प्रतिबंधित क्षेत्रात मध्ये आरोग्य मंत्रालयाच्या प्रमाणित कार्यप्रणालीचे पालन करण्यास सांगितले. सविस्तर विश्लेषणासह मृत्यूंबद्दल व्यापक आकडेवारीची आवश्यकता यावरही त्यांनी भर दिला. त्यांनी दर मंगळवार आणि शुक्रवारी एम्स, दिल्लीतर्फे आयोजित वेबिनारमध्ये राज्यांना सहभागी व्हायला सांगितले.
उच्च रुग्ण संख्या असलेल्या जिल्ह्यांतील 45 पेक्षा जास्त वयोगटातील लोकसंख्येचे 100 टक्के लसीकरण करण्याची विनंती पंतप्रधानांनी राज्यांना केली. पंतप्रधानांनी ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी 11 एप्रिल पासून बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपर्यंत म्हणजेच 14 एप्रिल पर्यंत लसीकरण महोत्सव आयोजित करण्याचे आवाहन केले. लसीकरण महोत्सवात अधिकाधिक लोकांना लस देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. तसेच 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाचे लसीकरण करण्यात मदत करण्याचे आवाहन त्यांनी युवकांना केले.
पंतप्रधानांनी निष्काळजीपणाविरोधात सावधानतेचा इशारा दिला. ते म्हणाले की, लसीकरण केल्यानंतरही आपण बेसावध राहता कामा नये आणि योग्य खबरदारी यापुढेही घ्यायची आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या ‘दवाई भी कडाई भी’ या मंत्रावर भर देत पंतप्रधानांनी कोविड योग्य वर्तनाविषयी जनजागृती करण्यावर भर दिला.
तीसरा- इस बार लोग पहले की अपेक्षा बहुत अधिक casual हो गए हैं। अधिकतर राज्यों में प्रशासन भी नज़र आ रहा है।
— PMO India (@PMOIndia) April 8, 2021
ऐसे में कोरोना केसेस की इस अचानक बढ़ोतरी ने मुश्किलें पैदा की हैं: PM @narendramodi
दूसरा- महाराष्ट्र, छत्तीसगढ़, पंजाब, मध्यप्रदेश और गुजरात समेत कई राज्य फ़र्स्ट वेव की पीक को भी क्रॉस कर चुके हैं।
— PMO India (@PMOIndia) April 8, 2021
कुछ और राज्य भी इस ओर बढ़ रहे हैं। हम सबके लिए ये चिंता का विषय है।
ये एक serious concern है: PM @narendramodi
आज की समीक्षा में कुछ बातें हमारे सामने स्पष्ट हैं, उन पर हमें विशेष ध्यान देने की जरूरत है।
— PMO India (@PMOIndia) April 8, 2021
पहला- देश फ़र्स्ट वेव के समय की पीक को क्रॉस कर चुका है, और इस बार ये ग्रोथ रेट पहले से भी ज्यादा तेज है: PM @narendramodi
इन तमाम चुनौतियों के बावजूद, हमारे पास पहले की अपेक्षा बेहतर अनुभव है, संसाधन हैं, और वैक्सीन भी है।
— PMO India (@PMOIndia) April 8, 2021
जनभागीदारी के साथ-साथ हमारे परिश्रमी डॉक्टर्स और हेल्थ-केयर स्टाफ ने स्थिति को संभालने में बहुत मदद की है और आज भी कर रहे हैं: PM @narendramodi
‘Test, Track, Treat’, Covid appropriate behaviour और Covid Management, इन्हीं चीजों पर हमें बल देना है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 8, 2021
हमारा प्रयास यही होना चाहिए कि इस टीका उत्सव में हम ज्यादा से ज्यादा लोगों को वैक्सीनेट करें।
— PMO India (@PMOIndia) April 8, 2021
मैं देश के युवाओं से भी आग्रह करूंगा कि आप अपने आसपास जो भी व्यक्ति 45 साल के ऊपर के हैं, उन्हें वैक्सीन लगवाने में हर संभव मदद करें: PM @narendramodi
11 अप्रैल, ज्योतिबा फुले जी की जन्मजयंति है और 14 अप्रैल, बाबा साहेब की जन्म जयंति है, उस बीच हम सभी ‘टीका उत्सव’ मनाएं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 8, 2021
वैक्सीनेशन के साथ साथ हमें ये भी ध्यान रखना है कि वैक्सीन लगवाने के बाद की लापरवाही न बढ़े।
— PMO India (@PMOIndia) April 8, 2021
हमें लोगों को ये बार-बार बताना होगा कि वैक्सीन लगने के बाद भी मास्क और सावधानी जरूरी है: PM @narendramodi