देशात आज फाळणी वेदना स्मृती दिवसानिमित्त फाळणीमध्ये प्राण गमावलेल्या व्यक्तींचे स्मरण केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फाळणीत बळी पडलेल्या व्यक्तींचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. घरदार सोडायला भाग पडल्याने या व्यक्तींना कराव्या लागलेल्या संघर्षाचे स्मरण पंतप्रधानांनी केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
''फाळणी वेदना स्मृती दिवस हा देशाच्या फाळणीत ज्यांचे जीवन कामी आले त्या भारतवासीयांचे श्रद्धापूर्वक स्मरण करण्याचा दिवस आहे. यासोबतच हा दिवस असहायपणे आपल्याला विस्थापित होण्याची तीव्र वेदना सहन करावी लागलेल्यांच्या दु:खाची आणि संघर्षाची आठवण करून देतो. अशा सर्व लोकांना मी शतशः नमन करतो.''
विभाजन विभीषिका स्मृति दिवस उन भारतवासियों को श्रद्धापूर्वक स्मरण करने का अवसर है, जिनका जीवन देश के बंटवारे की बलि चढ़ गया। इसके साथ ही यह दिन उन लोगों के कष्ट और संघर्ष की भी याद दिलाता है, जिन्हें विस्थापन का दंश झेलने को मजबूर होना पड़ा। ऐसे सभी लोगों को मेरा शत-शत नमन।
— Narendra Modi (@narendramodi) August 14, 2023