पोर्ट ब्लेअर येथे नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी तिरंगा फडकवला होता, त्या घटनेच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोर्ट ब्लेअर येथे जाऊन तिरंगा फडकवला आणि बोस यांना आदरांजली अर्पण केली. अशी माहिती पंतप्रधानांनी व्टिटरच्या माध्यमातून दिली.
‘‘दि. 30 डिसेंबर, 1943… हा दिवस प्रत्येक भारतीयांच्या कायम स्मरणात राहणारा दिवस आहे. शूर नेताजी सुभाष बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे याच दिवशी तिरंगा फडकवला होता. या घटनेच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त मी, आज पोर्ट ब्लेअरला गेलो आणि आजच्या विशेष दिनी तिथे तिरंगा फडकवण्याचा मला सन्मान मिळाला. काही आठवणी सामायिक करीत आहे.’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्टिटर संदेशात म्हटले आहे.
30th December 1943...a day etched in the memory of every Indian, when the brave Netaji Subhas Bose unfurled the Tricolour at Port Blair. To mark the 75th anniversary of this special day, I had gone to Port Blair and had the honour of hoisting the Tricolour. Sharing some memories. pic.twitter.com/aUEKfvEnN8
— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2020