आचार्य कृपलानी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा व धैर्य यांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून त्यांचे स्मरण करताना पंतप्रधान मोदी यांनी गरीब तसेच उपेक्षितांना सक्षम करणाऱ्या समृद्ध, बलशाली अशा आदर्श भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
त्यांनी एक्सवर एका पोस्टमध्ये लिहिले:
"आचार्य कृपलानी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील ते एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा व धैर्य यांचे मूर्तिमंत प्रतीक होते. लोकशाही मूल्ये आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वांशी ते अत्यंत कटिबद्ध होते.
आचार्य कृपलानी अन्यायाविरुद्ध लढण्यास कधीही कचरले नाहीत. गरीब तसेच उपेक्षितांना सक्षम करणाऱ्या समृद्ध, बलशाली अशा आदर्श भारताचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करतो.''
Remembering Acharya Kripalani on his birth anniversary. He was a towering figure in India’s freedom struggle and an embodiment of intellect, integrity and courage. He was deeply committed to democratic values and principles of social justice.
— Narendra Modi (@narendramodi) November 11, 2024
Acharya Kripalani was unafraid to…