पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दशकभरातील घडामोडींचा लोकांच्या जीवनमानावर किती खोलवर परिणाम झाला आहे हे अधोरेखीत करणार्या समाज माध्यमावरील एका अंतर्दृष्टीपूर्ण पोस्ट श्रृंखलेची दखल घेत त्यावर आपला अभिप्राय नोंदवला. पोस्ट श्रृंखलेमधून गेल्या काही वर्षांमधील देशाच्या आणि नागरिकांच्या परिवर्तनशील वाटचालीच्या प्रवासाचे दर्शन होते.
यासंदर्भात इन्फोइनडेटा हॅण्डलने एक्स या समाज माध्यमावर केलेल्या पोस्टवर अभिप्राय नोंदवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेला संदेश :
‘गेल्या दशकभरात लोकांच्या जीवनात कसा बदल झाला आहे, याची अंतर्दृष्टीपूर्ण झलक दाखवणारी ही पोस्ट श्रृंखला’
An insightful thread, offering a glimpse of how people’s lives have been transformed over the last decade. https://t.co/XYY6Tf36p0
— Narendra Modi (@narendramodi) December 31, 2024