लक्झेम्बर्गचे पंतप्रधान ल्युक फ्रायडेन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी पुन्हा निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान फ्रायडेन यांच्या शुभेच्छांबद्दल आभार व्यक्त करून पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही देशांदरम्यान बहुआयामी सहकार्याला अधिक ताकद आणि वेग देण्याची अपेक्षा व्यक्त केली.
दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शाश्वत अर्थसहाय्य, औद्योगिक उत्पादन, आरोग्य, अंतराळ आणि जनतेचा परस्पर संपर्क यांसह विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय भागीदारी मजबूत करण्याच्या उद्देशाने काम करण्याच्या वचनबद्धतेला दोन्ही नेत्यांनी दुजोरा दिला. यावेळी केलेल्या चर्चेत युक्रेनमधील संघर्षाच्या स्थितीसह इतर अनेक क्षेत्रीय आणि जागतिक पातळीवरील समस्यांबाबत दोन्ही नेत्यांनी विचारांची देवाणघेवाण केली. युक्रेनमधील संघर्ष लवकरात लवकर संपुष्टात आणून तेथे शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने भारताने घेतलेल्या भूमिकेची पंतप्रधान फ्रायडेन यांनी प्रशंसा केली.
यावेळी पंतप्रधानांनी ग्रँड ड्यूक हेन्री आणि पंतप्रधान फ्रायडेन यांना भारतभेटीचे आमंत्रण दिले.
दोन्ही नेत्यांनी परस्परांच्या कायम संपर्कात राहण्याचे मान्य केले.
Had a good conversation with Prime Minister @LucFrieden. Reiterated commitment to deepen and strengthen India-Luxembourg ties including in the areas of trade, investment, financial services and industrial manufacturing. As democracies, we support regional and global peace and…
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2024